Majhi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जमा झाले आहेत. महिला मागील अनेक दिवसांपासून ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होत्या अखेर महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सामाजिक माध्यमांवर माहिती दिली की, आज पासून सर्व लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचा निधी जमा होणार आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना अतिशय महत्त्वाची ठरत आहे.
ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा
लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्ट महिना वितरित करण्यासाठी सरकारने तब्बल 344.30 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. 9 सप्टेंबर रोजी यासंदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर हा निधी लाभार्थी महिलांच्या थेट बँक खात्यात 11 सप्टेंबर 2025 रोजी जमा करण्यात आला आहे. ही योजना जुलै 2024 मध्ये महायुती सरकारने सुरू केली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 14 हप्ते जमा करण्यात आले आहेत. Majhi Ladki Bahin Yojana
हे पण वाचा| खुशखबर! ऑगस्ट महिन्याचे ₹1500 खात्यात खटाखट येणार, सरकारने घेतला मोठा निर्णय
लाडकी बहीण योजनेचा लाभ थेट आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केला जातो. यामुळे कोणताही मध्यस्थ नाही ज्यामुळे पारदर्शकता राहते आणि महिलांना थेट मदत मिळते. ऑगस्ट महिन्याचा हप्ता उशिरा मिळाल्यामुळे अनेक महिला संभ्रमात होत्या. मात्र आता पैसे मिळाल्यामुळे महिलांना दिलासा मिळाला आहे. लाडकी बहीण योजना ही केवळ एक आर्थिक मदत देणारी योजना नाही, तर महिलांच्या आत्मविश्वासाला चालना देणारी योजना ठरत आहे. ग्रामीण भागातील अनेक महिला या पैशातून आपला घर खर्च भागवत आहेत. तर काही महिला या पैशातून छोटा मोठा व्यवसाय सुरू करत आहेत.
सरकारच्या दृष्टीने ही योजना राजकीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाची मानली जाते. कारण या योजनेचा आधार घेऊनच महायुती सरकार प्रचंड बहुमताने निवडून आले होते. या योजनेचा लाभ देऊन महिलांचा थेट विश्वास मिळवणं हा सरकारचा उद्देश आहे. शेवटी राज्यातील गोरगरीब लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावर आनंद दिसला हेच महत्त्वाचे आहे. सरकारने दिलेली ही मदत महिलांच्या रोजच्या जगण्याचा मोठा आधार बनत आहे. ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले असले तरी आता सप्टेंबर महिन्याचे पैसे देखील लवकरात लवकर महिलांना मिळतील अशी अपेक्षा आहे.