Majhi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी खास लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचे लक्ष आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे लागले आहे. दरम्यान ऑगस्ट महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र अजूनही ऑगस्ट महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात कधी जमा होणार याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. त्यामुळे ऑगस्टचा हप्ता महिलांच्या खात्यात उशिरा जमा होणार का असा प्रश्न निर्माण होत आहे. त्याचबरोबर सध्या प्रसारमाध्यमांमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे एकत्रित मिळणार का?
दरम्यान लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना एकच प्रश्न पडला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये मिळणार का? गेल्या अनेक महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळण्यासाठी विलंब होत आहे. लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना पुढच्या महिन्यात पैसे मिळत आहेत. हा महिना संपण्यासाठी देखील अवघे काही दिवस राहिल्यामुळे या महिन्याचे पैसे देखील पुढील महिन्यात जाण्याची शक्यता आहे. आणि जर हा हप्ता सप्टेंबर महिन्यामध्ये गेला तर ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा दोन महिन्याचे पैसे एकत्रित मिळू शकतात. मात्र याबाबत सरकारकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही. Majhi Ladki Bahin Yojana
हे पण वाचा| 1 सप्टेंबरपासून दुचाकीस्वारांसाठी नवे नियम लागू! नियम मोडणाऱ्यांवर होणार मोठी कारवाई
या दिवशी खात्यात 3000 जमा होऊ शकतात
जर लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये मिळाले तर ते कधी मिळू शकतात असा प्रश्न देखील निर्माण होत आहे. अनेक वेळा आपण पाहिले जर पैसे उशिरा मिळाले किंवा एखादा सण असेल तर त्या सणानिमित्त महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. याच पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात गणेश उत्सव सुरू होत आहे. त्यामुळे गणेश उत्सवाच्या काळात महिलांना खुशखबरी मिळू शकते. लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. मात्र या काळात दोन हप्ते महिलांना मिळणार का एक हप्ता असा प्रश्न देखील निर्माण होत आहे. अजून याबाबत सरकारने कोणतेही अधिकृत घोषणा केलेली नाही. लवकरच याबाबत अधिकृत माहिती समोर येईल. अधिकृत माहितीची सर्वात आधी अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा.
1 thought on “लाडक्या बहिणींना ऑगस्ट अन् सप्टेंबरचा हप्ता एकत्रित मिळणार? या दिवशी खात्यात ₹3,000 जमा होण्याची शक्यता”