Mazi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिला जुलै महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांच्यासाठी आता ही प्रतीक्षा संपणार आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी नुकतीच जुलै महिन्याच्या हप्त्याची तारीख घोषित केली आहे. आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनानिमित्त खास गिफ्ट म्हणून थेट महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांचा निधी थेट बँक खात्यात जमा केला जातो. मात्र जुलै महिना संपल्यानंतरही या महिन्याचा हप्ता जमाना झाल्यामुळे अनेक महिलांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर यावर स्पष्टीकरण देत आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर ट्विट करून सांगितले आहे की, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आमच्या सरकारच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र महिलांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यात येणार आहे.
हे पण वाचा| या लाडक्या बहिणींना मोठा धक्का! योजनेचा गैरवापर करणाऱ्यांवर होणार कारवाई -आदिती तटकरे
आदिती तटकरे यांच्या या घोषणामुळे राज्यातील लाखो महिलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला आहे. रक्षाबंधनासारख्या पवित्र सणा दिवशी महिलांना आर्थिक मदतीचे मोठे गिफ्ट मिळणार आहे. हा निधी थेट महाधिबीटी द्वारे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही मध्य स्थानाची गरज राहणार नाही आणि योजनेमध्ये पारदर्शकता निर्माण होईल. यामुळे रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यासाठी महिलांना आर्थिक मदत मिळेल आणि त्यांच्या आनंदाला आणखीन भर मिळेल. सरकारचा निर्णय महिलांच्या सन्मानाला आणि आर्थिक दृष्ट्या प्रबळ होण्यासाठी प्रोत्साहन देणारा आहे.
दरम्यान या योजनेअंतर्गत अनेक गैरप्रकार घडल्याचे समोर आले आहे. या योजनेचा चुकीच्या पद्धतीने पुरुषांनी महिलांच्या नावाने अर्ज भरून लाभ घेतल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर अनेक सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे देखील समोर आले आहे. त्यामुळे सरकारने या योजनेची पुन्हा एकदा पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. पडताळणी दरम्यान ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत त्यांना या योजनेतून अपात्र ठरवले जात आहे. Mazi Ladki Bahin Yojana
थोडक्यात मिळालेल्या माहितीनुसार, लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये रक्षाबंधन निमित्त जुलै महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत. या आर्थिक मदतीमुळे महिलांना रक्षाबंधन सण साजरा करण्यास अधिक उत्साह निर्माण झाला आहे. दरम्यान प्रसार माध्यमांमध्ये जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रित दिले जाऊ शकतात अशा बातम्या येत होत्या. मात्र अदिती तटकरे यांच्या ट्विट नंतर हे स्पष्ट होते की महिलांना रक्षाबंधन निमित्त फक्त जुलै महिन्याचे 1500 रुपयेच मिळणार आहेत.
2 thoughts on “खुशखबर! लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार? आदिती तटकरे यांनी सांगितली तारीख…”