Mazi Ladki Bahin Yojana: राज्यातील लाखो महिलांना आर्थिक आधार देणारी आणि त्यांच्या जीवनमानाचा महत्त्वाचा आधार बनलेली मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेबाबत अनेक चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये होत असतात. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक आधार दिला जातो. जून महिन्यात ही योजना सुरू झाली आणि सुरुवातीपासूनच या योजनेअंतर्गत अनेक पात्र व अपात्र महिलांनी देखील लाभ घेतला. कालांतराने यामध्ये पडताळणी करून अपात्र महिलांना या योजनेतून वगळण्यात आले. या योजनेच्या निकषांमध्ये ज्या महिला बसतात त्यांनाच या योजनेचा लाभ आता दिला जात आहे.
या योजनेचे अंमलबजावणी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आली होती. या योजनेमुळे सरकारला मोठा फायदा देखील मिळाला. विधानसभा निवडणुकीमध्ये लाभार्थी महिलांच्या निधीमध्ये वाढ करून 2100 रुपये करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. निवडणुका पार पडून सहा महिन्याहून अधिक काळ उलटल्यानंतर दरमहा 2100 रुपयाची अंमलबजावणी बाबत अजून निर्णय झाला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या नशिबात आणखीन प्रतीक्षा कायम आहे. Mazi Ladki Bahin Yojana
हे पण वाचा| मोठी बातमी! लाडक्या बहिण योजनेतून 26 लाख महिला अपात्र? तुमचे नाव आहे का?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना या योजनेबाबत स्पष्ट भूमिका दिली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की निवडणुका नंतर लाडकी बहिणी योजनेत काही मापदंड लागू करण्यात आले आहेत. लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे. योजना कायम राहील आणि योग्य वेळ आल्यावर लाभाची रक्कम वाढवली जाईल. या सगळ्यात राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊनच पुढील निर्णय घेतला जाईल. लाडक्या बहिणींना 2100 रुपये दरमहा आमचे सरकार नक्कीच देणार आहे याबद्दल काही शंका नाही. विरोधकांकडून या योजनेबाबत अनेक चित्र विचित्र टीका केला जातात. ही योजना बंद होईल या योजनेचा काही फायदा नाही अशा अनेक टीका होतात मात्र यात कुठलेही तथ्य नाही असे त्यांनी सांगितले आहे.
लाडकी बहीण योजनेमुळे दर महिन्याला राज्याच्या तिजोरीवर हजारो कोटी रुपयांचा भार होत आहे. यामध्ये पैसे वाढले तर खर्च आणखीन वाढणार आहे. सध्या राज्याची आर्थिक स्थिती तणावाखाली असल्यामुळे प्रशासनाच्या माध्यमातून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. परिस्थिती सुधारल्यानंतरच 2100 रुपयाचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ग्रामीण भागातील अनेक महिला या योजनेलाच आधार म्हणून आपल्या दैनंदिन गरजा भागवत आहेत. या योजनेचा पैसा योग्य ठिकाणी वापरला जात असल्यामुळे यात वाढ होणार याची घोषणा ऐकल्यानंतर महिलांच्या मनात आनंद निर्माण झाला आहे. पण वेळ जसजशी पुढे सरकत आहे तसा महिलांचा संयम सुटत आहे.
लाडकी बहीण योजनेतून दरमहा पंधराशे रुपयांचा हप्ता सध्या सुरू आहे. मात्र हा हप्ता 2100 रुपये करू अशा आश्वासन सरकारने दिल्यामुळे हे आश्वासन सरकार कधी पूर्ण करणार याकडे राज्यातील सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. मात्र याबाबत स्पष्टता येण्यास आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये दरमहा 1500 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जाईल.
2 thoughts on “Mazi Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती..”