दहावी-बारावी पास तरुणांना मिरा-भाईंदर महानगरपालिकेमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी, 358 जागांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू..

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025: आजकाल बेरोजगारीच्या काळात प्रत्येक तरुण नोकरीच्या शोधात आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता कुठे स्थिर नोकरी मिळेल असा प्रश्न प्रत्येक तरुणांसमोर उपस्थित होत आहे. अशातच मिरा-भाईंदर महानगरपालिकेत तरुणांसाठी नोकरी करण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. नगरपालिकेमध्ये तब्बल 358 रिक्त पदांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली असून यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

अर्ज करण्याची तारीख?

या मेगा भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात 22 ऑगस्ट 2025 पासून झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2025 ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना नोकरी करायचे आहे त्यांनी या संधीचा फायदा घ्यावा. उमेदवाराने विलंब न करता वेळेत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
अधिकृत जाहिरातइथे क्लिक करा
Telegram channelइथे जॉईन करा

कोणत्या पदासाठी होणार भरती?

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या या भरतीत विविध विभागातील पदांचा समावेश आहे.

  • लिपिक टंकलेखक
  • ज्यूनियर इंजिनियर
  • सर्वेक्षक
  • प्लंबर, फीटर, पंप ऑपरेटर

इत्यादी पदासोबत इतर अनेक पदे देखील आहेत. म्हणजेच दहावी बारावी पास असणाऱ्यांसाठी त्याचबरोबर पदवीधरापर्यंत सर्वांनाच नोकरी करण्याची ही संधी उपलब्ध आहे.

अर्ज कसा करावा?

या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने ठेवण्यात आली आहे. उमेदवारांनी थेट महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज सादर करायचा आहे. Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025

अर्ज शुल्क किती आहे?

  • खुला प्रवर्ग: 1000 रुपये
  • मागास प्रवर्ग/अनाथ प्रवर्ग: 900 रुपये
  • माजी सैनिक: शुल्क माफ.

हे पण वाचा| राज्य सरकारचा मोठा निर्णय! मेगा पोलीस भरती जाहीर; कोणत्या पोस्टसाठी किती जागा? जाणून घ्या

वयोमर्यादा किती आहे?

  • किमान वय: 18 वर्ष
  • कमाल वय: 38 वर्ष
  • ओबीसी व अनाथ उमेदवारांसाठी: 43 वर्षापर्यंत सवलत आहे.

परीक्षा व प्रवेश पत्र

या भरतीसाठी ची परीक्षा देखील ऑनलाईन घेण्यात येणार आहे. परीक्षेच्या आधी सात दिवस उमेदवारांना प्रवेश पत्र डाउनलोड करण्याची सुविधा दिली जाईल. परीक्षेची तारीख महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात येईल. या भरतीमध्ये आरक्षणाचा फायदा सरकारी नियमानुसार लागू केला जाणार आहे. अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, आर्थिक दुर्बळ घटक तसेच महिला, खेळाडू, माजी सैनिक यांनाही आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे.

शैक्षणिक पात्रता

प्रत्येक पदा नुसार शैक्षणिक पात्रता वेगळी आहे.

  • काही पदासाठी फक्त दहावी पास किंवा बारावी पास उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.
  • काही पदासाठी अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा आवश्यक आहे.
  • तर काही तांत्रिक पदासाठी अनुभवाची अट देखील ठेवण्यात आली आहे.
  • प्रत्येक पदा नुसार पात्रता जाणून घेण्यासाठी उमेदवाराने अधिकृत जाहिरात पहावी.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “दहावी-बारावी पास तरुणांना मिरा-भाईंदर महानगरपालिकेमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी, 358 जागांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू..”

Leave a Comment

error: Content is protected !!