Monsoon Rain Update: राज्यात मान्सून ने दमदार एन्ट्री केली असली तरी महाराष्ट्रात सर्वत्र सारखा पाऊस पडत असल्याचे चित्र दिसत नाही. राज्यातील काही भागांमध्ये जोरदार मुसळधार पाऊस होत आहे तर काही भागांमध्ये हवामान पूर्णपणे कोरडे दिसत आहे. पुढील पाच दिवसात कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाची हजेरी लागणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मात्र मराठवाडा अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंताचे वातावरण दिसत आहे.
कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पाऊस
राज्यात मान्सूनचे जोरदार आगमन झाले आहे विशेषता कोकण घाटमाथा आणि सखल भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान विभागाने या भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनचे वारे अधिक सक्रिय झाले आहे. यामुळे राज्यातील अनेक भागात मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकण आणि घाटमाथा परिसरात जोरदार पावसाची शक्यता असून येथील नागरिकांनी योग्य ती काळजी बाळगणे आवश्यक आहे.
हे पण वाचा| महाराष्ट्रात आता मुसळधार पाऊस कधी होणार? पंजाबराव डख यांनी सांगितली तारीख… वाचा सविस्तर
पुढील 5 दिवस कसे राहणार हवामान?
- पुढील पाच दिवस कोकण व घाटमाथा परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि त्यासाठी अवमान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केले आहे.
- मध्य महाराष्ट्रामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- विदर्भामध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून या भागात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
- मराठवाडा मध्ये पावसाची तीव्रता कमी असून, या भागातील नागरिकांना आणखीन काही दिवस पावसाची वाट पहावी लागू शकते.
मराठवाड्यात पाऊस कमी?
मराठवाडा हा पर्जन्यछायत येतो. गाठमाथ्यावर पडणाऱ्या पावसाने वाऱ्यातील बाष्प कमी होते. त्यामुळे मराठवाड्यात पोहोचणाऱ्या वाऱ्यांमध्ये आद्रता कमी राहते आणि येथे पावसाचा जोर कमी होतो. यावर्षीही अशीच परिस्थिती असून बंगालच्या उपसागरातील उत्तर भागात कमी दाबाचा प्रभाव अधिक असल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला आहे. या भागातील शेतकऱ्यांना कमी पावसामुळे पिकाच्या मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. Monsoon Rain Update
राज्यातील नागरिकांना हवामान विभागाने सतर्क राहण्याचा आणि गरज असल्यास घरात थांबण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे कोकण गाठमाता आणि विदर्भातील नागरिकांनी मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. असे प्रशासनाने कळवले आहे. या मान्सून मध्ये तुमच्या भागात पावसाची स्थिती कशी आहे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा.
1 thought on “राज्यातील या भागात धो–धो पाऊस तर हा भाग अजूनही कोरडा! जाणून घ्या पुढील 5 दिवसाचा हवामान अंदाज”