एस टी महामंडळ मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; इच्छुक उमेदवारांनी लगेच अर्ज करा


MSRTC Bharti 2025 : नोकरी शोधताय? परंतु हवी तशी नोकरी मिळत नाही. तसेच सरकारी नोकरी करण्याची इच्छा आहे तर तुमच्यासाठी ही एक महत्त्वाची बातमी ठरणार आहे. कारण, आता एसटी महामंडळाकडून तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या ( MSRTC) नाशिक विभाग मध्ये विविध प्रशिक्षणार्थी पदांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कामाच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी आहे यासाठी कशा पकारे अर्ज करू शकता. अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया खालील प्रमाणे दिलेले आहे. MSRTC Bharti 2025

भरतीची ठळक माहिती

ही भरती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नाशिक विभाग अंतर्गत राबवण्यात येत आहे यामध्ये विविध पदे (Apprentice ) भरण्यात येणार आहेत. या भरतीची पद्धत ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे असणार आहे तसेच इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या प्रमाणे लवकरात लवकर अर्ज करायचा आहे.

कोण अर्ज करू शकतो?

ज्यांनी आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) मध्ये शिक्षण पूर्ण केलेले आहे अशा तरुण-तरुणींनी या भरतीसाठी अर्ज करायचा आहे. वेगवेगळ्या ट्रेड प्रमाणे (Electrician, Mechanic, Welder, Diesel Mechanical, etc.) पदे भरण्यात येणार आहेत.

पात्रता काय?

या पद भरतीसाठी उमेदवार दहावी पास असणे आवश्यक आहे संबंधित ट्रेड मधून ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच वय आणि इतर अटी जाहिरात मध्ये नमूद करण्यात आलेले आहे.

अर्ज कसा करायचा (step by step)

या पद भरतीसाठी सर्वात प्रथम उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. त्यानंतर अर्जाची प्रिंट घेऊन भरावा. भरलेला अर्ज नाशिक विभागीय कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन सादर करायचा आहे. यासाठी पत्ता N.D पटेल रोड, शिंगाडा तलाव, नाशिक.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

अर्ज करताना उमेदवारांनी सर्व कागदपत्रे यांची झेरॉक्स प्रत सोबत जोडायचे आहे अर्जाचा नमुना महामंडळाच्या कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहे. सध्या ही नोकरी तरुण पिढीसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे ज्यांना ही या नोकरी करण्या साठी इच्छा आहे त्यांनी अर्ज करायचा आहे.

हे पण वाचा | ST Bus News : ST महामंडळ मध्ये बंपर भरती, नोकरी करण्याचे सुवर्णसंधी! वाचा सविस्तर माहित

Leave a Comment

error: Content is protected !!