Mukesh Ambani video viral : मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन म्हणजे भक्तांसाठी स्वप्न सारखा असतं. लांब वरच्या खेड्यापाड्या मधून गावोगावी लोक घरची शेती कामधंदे सोडून रांगेत उभे राहतात. काहीजण 12 तास उपाशीपोटी उभे राहून बाप्पाच्या दर्शनाची आस लावून असतात. थकलेल्या डोळ्यांनी तेवढं एक क्षण बघण्यासाठी जीवाच्या आटापिटा करतात. पण दुसरीकडे मोठ्या मोठ्या लोकांना काही मिनिटातच थेट बाप्पा समोर हजेरी लावता येते. या विरोधाभासावरूनच आता पुन्हा एकदा गरीबी आणि श्रीमंती मधला फरकाचा प्रश्न लोकांसमोर आला आहे. Mukesh Ambani video viral
सदा सोशल मीडियावरती एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी त्यांची पत्नी नीता अंबानी लालबागच्या राजाच्या चरणी माता टेकताना दिसत आहे. देवासमोर हात जोडून प्रार्थना करणारा हा व्हिडिओ काही श्रद्धेचा वाटला, पण बहुसंख्य लोकांना मात्र यातून दिसलेलं वास्तव्य खटकते. करण लाखो सामान्य भक्त रांगेत धक्काबुक्की सहन करत उभे असताना अंबानी कुटुंब थेट देवळात जाऊन निवांत दर्शन घेतात. आणि याच गोष्टीवरून लोक म्हणतात की श्रद्धा पेक्षा पैसा मोठा ठरतोय का?
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
हा व्हिडिओ एका इंस्टाग्राम पेज वरती शेअर करण्यात आलेला आहे. माणसापेक्षा पैसा मोठा, श्रद्धेपेक्षा पैसा मोठा.. अशा कॅप्शन मुळे व्हिडिओ आणखी चर्चेत आला आहे. पाहता पाहता 3.2 मिलियन लोकांनी हा व्हिडिओ बघितला. अनेकांनी थेट कमेंटमध्ये संताप्त व्यक्त केला. कुणी म्हणालं बाप्पा श्रीमंतांचा आहे का गरिबांचा? तर दुसऱ्यांना लिहिलं, जिथे गरीबी भक्त 12- 13 तास रांगेत उभा राहतो, तिथे श्रीमंतांना काही मिनिटात दर्शन हे कसले न्याय?
काहींनी तर थेट हा प्रश्न उपस्थित केला की, श्रद्धा जर खरी असेल तर घरी बसूनसुद्धा बाप्पा पाहतात. मग एवढी गर्दी करून, तासन्तास धक्काबुक्की करून काय मिळतं? पण तरीही गरीब भक्त आपल्या मनापासून श्रद्धेने रांगेत उभा राहतो. त्याला वाटतं की त्याचं कष्टाचं फळ म्हणजे देवाचं दर्शन. मात्र श्रीमंतांच्या हातात पैसा आहे, ओळख आहे म्हणून त्यांना हा कष्टाचा मार्ग सोपा होतो.
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
या व्हिडीओने पुन्हा एकदा समाजासमोर तीच जुनी वेदना उभी केली आहे गरीबासाठी वेगळा नियम आणि श्रीमंतासाठी वेगळा. लोकांच्या मनातला प्रश्न तसाच आहे, “बाप्पा खरोखर सर्वांचा आहे का फक्त श्रीमंतांचा?” आणि यामुळे भक्तांच्या भावनांना चांगलाच धक्का बसला आहे.