Namo Shetkari Yojana 7th Installment: शेतकऱ्यांच्या आयुष्यात प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आधार ठरणारी त्याचबरोबर पावसाच्या अनिश्चितेमुळे, वाढलेली खत बियाण्याचे दर, बाजारभावातील चढ-उतार यामुळे शेतकरी कायमच आर्थिक अडचणीत असतो. अशावेळी शेतकऱ्यांच्या हातात थोडीशी आर्थिक मदत मिळाली तर घर खर्च शेतीचा खर्च, कर्जफेड करण्यास मदत होईल. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी योजना म्हणजे नमो शेतकरी महा सन्मान योजना ही अतिशय महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दरवर्षी 12 हजार रुपयांचा थेट मदत सरकारकडून केली जाते. यामध्ये सहा हजार रुपये केंद्र सरकारकडून तर उरलेले सहा हजार रुपये राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत दिले जातात.
नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार?
सध्या राज्यातील शेतकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय म्हणजे, सातवा हप्ता नक्की कधी येणार? कृषी विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर साधारण नऊ ते दहा दिवसानंतर नमो शेतकरी सन्मानित योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा सातवा हप्ता साधारणपणे बैलपोळ्याच्या सणाच्या आसपास शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो. म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या अखेर किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता जमा होईल अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
हे पण वाचा| नवीन रेशनकार्ड घरबसल्या ऑनलाईन कसं काढायचं अन् कोणती कागदपत्रे लागतील? जाणून घ्या सविस्तर
सोशल मीडियावरील अफवा खरी का खोटी?
अलीकडे सोशल मीडियावर या योजनेबाबत अनेक अफवा पसरत आहेत. काहीजण म्हणतात की ही योजना बंद होणार आहे. तर काही जण रकमेत कपात होईल असं सांगत आहेत. मात्र कृषी विभागाकडून मिळालेल्या खात्रीशीर माहिती नुसार, या सर्व अफवांमध्ये कोणतेही तथ्य नाही. सातवा हप्ता नक्कीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. Namo Shetkari Yojana 7th Installment
निवडणुकीच्या काळात या योजनेतील वार्षिक मदत 12,000 वरून पंधरा हजार रुपये करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण प्रत्यक्षात याची अजून अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला शेतकऱ्यांना पूर्णपणेच 12 हजार रुपये वार्षिक रक्कम मिळणार आहे. या सातव्या हप्त्याचा लाभ राज्यातील तब्बल 96 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. लोक यात जवळपास चार लाख शेतकऱ्यांना मागील थकीत हप्त्याची रक्कम एकत्रित मिळेल. हा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारला जवळपास 1900 कोटी रुपयाचा निधी लागणार आहे.
शेतकऱ्यांनी या योजनेबाबत अधिकृत माहिती केवळ सरकारच्या किंवा कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन घ्यावी. कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये. पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वेळेवर येण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याची केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेचा सातवा हप्ता हा राज्यातील शेतकऱ्यांसाठी सणासुदीचा दिवसात दिलासा ठरू शकतो. नैसर्गिक आपत्ती, वाढती महागाई आणि कर्जाचा बोजा यामध्ये सरकारकडून मिळणारी ही मदत शेतकऱ्यांसाठी मोठ्या फायद्याची ठरत आहे.