शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये खात्यात जमा; तुमच्या खात्यात पैसे आले का?

Namo Shetkari Yojana 7th Installment: राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. एकीकडे पावसाचे अनिश्चित वातावरण असल्यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तर दुसरीकडे पिकांना योग्य भावना मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अशावेळी सरकारकडून शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळणं खूप महत्त्वाचा आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी महासामान्य योजनेअंतर्गत दोन हजार रुपये जमा झाले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी महासंबंधी योजनेचा सातवा हप्ता आज लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. यासाठी तब्बल 1892 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत जवळपास 91 लाख 65 हजार शेतकऱ्यांना थेट लाभ मिळाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या पी एम किसान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळतात. यात पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महासंघांनी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना आणखीन सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. म्हणजेच शेतकऱ्यांना एका वर्षात 12 हजार रुपयांच्या आर्थिक लाभ मिळतो.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडीबीटी द्वारे राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमो शेतकरी महा सन्माननिधी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा केले आहेत. यावेळी मुख्यमंत्री फडवणीस म्हणाले, शेतकरी कष्ट करतो तो देशाचा कणा आहे त्याला मदत मिळाली पाहिजे म्हणून आम्ही ही योजना प्रामाणिकपणे राबवत आहोत. आज सातवे हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. अशाच पद्धतीने ही योजना कायम आमचे सरकार सुरू ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे.

हे पण वाचा| नमो शेतकरी योजनेंतर्गत 7व्या हप्त्याचा लाभ या दिवशी खात्यात जमा होणार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता एक महिना उशिरा का होईना शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. बँकेत पासबुक अपडेट करत असताना पैसे जमा झाल्याचे पाहून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आहे. या पैशातून काही शेतकरी खच खरेदी करतात तर कोणी घर खर्च भागवण्यासाठी याचा वापर करतात. तर काही शेतकरी या पैशातून बँकेचा कर्जाचा हप्ता फेडणार आहेत. ज्याला जसे आवश्यक आहे तसे दोन हजार रुपयाचा वापर शेतकरी करत आहे.

दरम्यान काही शेतकरी असेही म्हणत आहेत की, बारा हजार रुपयांनी शेतीचा खर्च भागत नाही. खत बियाणे औषधे विज बिल आणि मजुरी यामध्ये वर्षाला लाखो रुपयांचा खर्च होत आहे. दिवसान दिवस वाढत चाललेली महागाई शेतकऱ्यांना चिंतेत पाडत आहे. त्यामुळे ही योजना खरी मदत नाही तर आधार बनत आहे. सरकारला खरंच शेतकऱ्याची मदत करावी असं वाटत असेल तर या रकमेत वाढ करून शेतकऱ्यांना शेतीसाठी येणाऱ्या खर्चात मोठा आर्थिक हातभार लावावा. Namo Shetkari Yojana 7th Installment

आज पैसे खात्यात जमा झाल्याने शेतकरी खुश आहेत. तरी खरी आशा आहे की पिकाला योग्य बाजारभाव मिळावा, सरकारकडून थेट मदतीपेक्षा शेती टिकाऊ आणि फायदेशीर व्हावी हीच सर्वांची इच्छा आहे. तोपर्यंत मात्र अशा योजनेचे हप्ते शेतकऱ्यांना मदत करणारे ठरत आहेत. सरकारने शेतकऱ्यांच्या शेती पिकांना योग्य तो हमीभाव दिल्यास शेतकऱ्यांना या आर्थिक मदतीची गरज देखील भासणार नाही. आपला देश खरंच कृषीप्रधान देश बनवायचा असेल तर शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला योग्य हमीभाव मिळवून देणे महत्त्वाचे ठरणार आहे.

तुमच्या खात्यात पैसे जमा झाले का नाही कसे तपासावे?

तुमच्या बँक खात्यात नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे 2000 जमा झाले का नाही ये तपासण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या बँकेच्या नेट बँकिंग सुविधेवर लॉगिन करावे लागेल. त्यानंतर तिथे बॅलन्स चेक करून किंवा स्टेटमेंट पाहून तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही याची तुम्ही खात्री करू शकता. त्याशिवाय तुम्ही डायरेक्ट बँकेत जाऊन तुमच्या पासबुक वर एन्ट्री करून तुमच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जमा झाले का नाही हे तपासून शकता.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!