Namo Shetkari Yojana: राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत असा हाफ ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याची प्रतीक्षा मागील काही दिवसापासून होती. गेल्या काही दिवसापासून चर्चेत असलेला नमो शेतकरी महासंघ निधी योजनेचा सत्व हप्ता अखेर राज्य सरकारने मंजूर केला आहे. राज्य सरकारने यासाठी तब्बल 1932 कोटी 72 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा आता पुढील पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.
किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?
राज्यातील एकूण 92.91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात सातवे हप्त्याचे दोन हजार रुपये जमा होणार आहेत. प्रत्येकी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहेत. राज्यातील लहान मध्यम आणि गरजू शेतकऱ्यांसाठी हा हप्ता खूप फायद्याचा ठरणार आहे. तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर या योजनेचा निधी वितरित होण्याअगोदर काही महत्त्वाच्या गोष्टी करून घेणे गरजेचे आहे. Namo Shetkari Yojana
राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकार अंतर्गत पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये दिले जातात. आणि याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणखीन सहा हजार रुपयांच्या लाभ देण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे. त्यामुळे राज्यातील एका शेतकऱ्यांना एकत्रित दरवर्षी 12 हजार रुपयांचा लाभ मिळतो. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना 20 हप्ते आतापर्यंत मिळाले आहेत. आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6 हप्ते मिळाले आहेत. सातवा हप्ता पुढील काही दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
हे पण वाचा| लाडक्या बहिणींना आता एकत्रित ₹3,000 मिळणार? ऑगस्ट-सप्टेंबर हप्त्याबाबत मोठी अपडेट्स आली समोर
नमोचा हप्ता मिळण्यास उशीर का झाला?
दोन ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांना दिला होता. त्याच दिवशी नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र राज्याची आर्थिक स्थिती उत्तम नसल्यामुळे हा हप्ता देण्यास उशीर झाला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वर्तवली जात होती. आता अखेर या योजनेचा जीआर निघाला असून शेतकऱ्यांना पुढील काही दिवसात नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळणार आहेत. या रकमेची तांत्रिक प्रक्रिया सुरू झाली असून, त्यासाठी अजून पंधरा दिवसाचा कालावधी लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
सध्या पावसाळ्यामुळे खरीप हंगाम सुरू आहे. राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही भागात दुबार पेरणीची वेळ देखील उपस्थित झाली आहे. अशावेळी शेतकऱ्यांना बियाणे खते औषधे घेण्यासाठी आर्थिक आधार या योजनेअंतर्गत मिळत आहे. अशा काळात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणारे हे दोन हजार रुपये त्यांना दिलासा देणारे ठरत आहेत. जरी ही रक्कम फार मोठी नसली तरी प्रत्येक शेतकऱ्यांना त्याच्या शेतीसाठी आवश्यक बाबी खरेदी करण्यासाठी नक्कीच महत्त्वाचे ठरतील. शेतकऱ्यांना गरजेचे वेळी झालेली मदत उभारी देणारी आहे.