शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार? आली नवीन अपडेट समोर वाचा सविस्तर


Namo shetkari Yojana Hapta | महाराष्ट्रातील शेतकरी दिवस रात्र शेतामध्ये मेहनत करतात. शेती करत असताना शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावा लागते. सध्या वाढती महागाई बियाणं, खत, मजुरी या सगळ्यांचा खर्च डोक्यावरती वाढत चाललेला आहे. अशावेळी सरकारकडून मिळणारे थोडीफार आर्थिक मदत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची ठरते. म्हणूनच सगळ्यांच्या नजरा सध्या शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्यावरती आहे. Namo shetkari Yojana Hapta

केंद्र सरकारचा हप्ता जमा?

दोन ऑगस्ट 2025 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचला. नियमाप्रमाणे पी एम किसान हप्ता मिळाल्यानंतर साधारण नऊ दहा दिवसात राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जातो. परंतु अद्याप जमा झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांमधून या हप्त्याची प्रतीक्षा केली जात आहे.

कधी मिळणार सातवा हप्ता?

अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिना खरेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सातवा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. यावेळी जवळपास 96 लाख पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता मिळणार असून, यासाठी तब्बल 1900 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. परंतु अद्याप सरकारने कुठलीही घोषणा केलेली नाही त्यामुळे शेतकरी बांधवांनी अधिकृत सूचनाकडे लक्ष द्यावे.

याला काही दिवसांपासून शेतकरी सातत्याने आपले बँक अकाउंट चेक करत आहेत कधी पैसे येतात कारण गेल्या काय महिन्यात आता वेळेवर न आल्याने शेतकरी बांधवांमध्ये नाराजीचा सूर निर्माण झालेला आहे. पावसामुळे अनिश्चित हंगाम, वाढलेले खर्च, बियाणं खताची टंचाई या सगळ्या परिस्थितीमध्ये सरकारकडून मिळणारे हे दोन हजार रुपये शेतकऱ्यांसाठी मोठे आधार ठरतात.

हे पण वाचा | Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार? आली मोठी अपडेट समोर

Leave a Comment

error: Content is protected !!