New GST Rates: नवरात्राच्या पहिल्या दिवशी केंद्र सरकारने देशातील नागरिकांना मोठी भेट दिली आहे. आज पासून देशभरात जीएसटी कपात करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील असंख्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी झाल्या आहेत. महागाईचा बोजा कमी करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेक वस्तू स्वस्त झाले आहेत तर काही निवडक वस्तूंच्या किमती महाग देखील झाल्या आहेत. आत्तापर्यंत जीएसटी चे स्लॅब होते पाच टक्के बारा टक्के 18 टक्के आणि 28% पण आता फक्त दोनच स्लॅब ठेवण्यात आले आहेत. पाच टक्के आणि 28% यामुळे अनेक वस्तूंच्या दरामध्ये मोठा बदल झाला आहे. एकूण 375 वस्तूच्या किमतीवर याचा परिणाम झाला आहे.
कोणत्या वस्तू झाल्या पूर्णपणे जीएसटी मुक्त?
घरातील स्वयंपाक घरापासून लेकरांच्या शाळेपर्यंत लागणाऱ्या अनेक जीवनावश्यक गोष्टीवर आता झिरो टक्के जीएसटी कर लागू करण्यात आला आहे.
- खाण्याचे पदार्थ: दूध, चीज, पिझ्झा, पोळी, पराठा, सर्व प्रकारची ब्रेड.
- शालेय साहित्य: पेन्सिल, नोटबुक, ग्लोब सराव पुस्तके, प्रयोगशाळाच्या नोटबुक
- आरोग्य सेवा: 33 जीवन आवश्यक औषधे तसेच आरोग्य आणि जीवन विमा पॉलिसी.
म्हणजेच आता मुलांना शाळेसाठी लागणाऱ्या वस्तू स्वस्त मिळणार आहेत. आई-बाबांसाठी घरातील रोजचे खाद्यपदार्थ खरेदी करणे देखील स्वस्त होणार आहे. त्याचबरोबर आजारपणाच्या वेळी लागणारे औषधे देखील कमी किमतीत मिळणार आहेत. New GST Rates
हे पण वाचा| आधार कार्ड अपडेट संदर्भात मोठा निर्णय! आधार कार्डबायोमेट्रिक अपडेटसाठी शुल्क आकारला जाणार नाही
पाच टक्के जीएसटी स्लॅब मध्ये कोणत्या वस्तू आहेत?
बहुतेक घरगुती वस्तू शेती उपकरणे आणि व्यावसायिक वापराच्या गोष्टी आता पाच टक्के जीएसटी मध्ये येत आहेत.
- अन्नपदार्थ: तेल, तूप, साखर, बिस्किट, चॉकलेट, नारळ पाणी.
- पर्सनल केअर: शाम्पू, हेअर, ऑइल, टूथपेस्ट, साबण.
- घरगुती वस्तू: भांडी, बाळाच्या बाटल्या, छत्र्या, डायपर्स, फर्निचर.
- शेतीसाठी: ट्रॅक्टर, पंप, स्प्रिंकलर, ठिबक सिंचन.
- हेल्थ प्रॉडक्ट्स: थर्मामीटर, ग्लुकोमीटर, चष्मा.
- कापड व पोशाख: तयार कपडे, कापसाच्या पिशव्या.
याचा थेट फायदा शेतकऱ्यांना आणि सामान्य कुटुंबातील नागरिकांना होणार आहे. शेतात वापरणाऱ्या यंत्रणाचा खर्च कमी होईल तर घरात रोज येणाऱ्या वस्तूचे दर देखील स्वस्त होणार आहेत.
18% जीएसटी स्लॅब मध्ये कोणत्या वस्तू?
- इलेक्ट्रॉनिक्स: एसी, वॉशिंग मशीन, टीव्ही, प्रोजेक्टर.
- वाहने: लहान कार, तीन चाकी, 350cc पर्यंतच्या बाईक.
- सेवा क्षेत्र: चित्रपट ग्रह, सौंदर्य सेवा.
यावेळी सर्वात मोठा जिल्हा सामान्य आरोग्य आणि जीवन विमा स्वस्त झाला आहे. पूर्वी 18% कर लागायचा आता तो कमी झाल्याने सर्वसामान्यांना प्रीमियमवरचा भार कमी होणार आहे. सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबीयांसाठी हे दिलासा देणारे ठरणार आहे.

1 thought on “आजपासून GST चे नवीन दर लागू! आता काय स्वस्त अन् काय महाग? जाणून घ्या सविस्तर..”