New Ration Card: गावात असो किंवा शहरात कुठेही असो रेशन कार्ड म्हणजे कुटुंबाच्या स्वयंपाक घरातला मोठा आधार आहे. मुलांना शाळेला डबा, घरी धान्याचा साठा, विज गॅसच्या कागदपत्रापासून शिष्यवृत्ती पर्यंत रेशन कार्ड असलं तर अनेक सरकारी कर्म सहज होतात. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आता नवीन रेशन कार्ड साठी तुम्हाला तहसील कार्यालयाच्या चक्र मारायची गरज नाही. तुम्ही थेट घरबसल्या आपल्या मोबाईल वरून हे काम पूर्ण करू शकता. महाराष्ट्र शासनाच्या RCMS अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज करता येतो. या लेखात आपण रेशन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
रेशन कार्डला ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सुरुवात कशी करावी?
सर्वप्रथम अधिकृत पोर्टलवर RCMS —self service from ration card हे पेज उघडा. या ठिकाणी नवीन युजर तयार करून पुढची सर्व माहिती भरायची असते.
त्याचबरोबर यासाठी पर्यायी मार्ग देखील आहेत. तुम्ही UMANG या मोबाईल ॲप मधून देखील रेशन कार्ड सेवांचा वापर करू शकता.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
कोणती कागदपत्र आवश्यक?
- ओळखीचा पुरावा: आधार / पॅन / मतदान ओळखपत्र
- पत्त्याचा पुरावा: विज बिल / भाडेकरार / आधार वरील पत्ता
- उत्पन्नाचा दाखला: गरजेनुसार
- कुटुंबातील सदस्यांचे पासपोर्ट साईज फोटो
- जुने रेशन कार्ड असल्यास: रद्द केल्याचा दाखला
- जन्म / लग्न प्रमाणपत्र: नाव समावेश / कुटुंब विभागासाठी
ऑनलाइन अर्ज कसा करावा? (स्टेप बाय स्टेप)
- Public login पेज उघडा —new user sign up करा.
- User ID/ password तयार केल्यानंतर लॉग इन करा.
- कॅप्चर टाकून गेट ओटीपी या पर्यायावर क्लिक करा आणि आलेला ओटीपी अचूक टाका.
- Application request—apply for new ration card हा पर्याय निवडा.
- कुटुंबप्रमुख व सर्व सदस्यांची वैयक्तिक माहिती, पत्ता, युनिट्स इत्यादी काळजीपूर्वक भरा. त्याचबरोबर आवश्यक कागदपत्र अपलोड करा.
- Submit for payment करून लागू शुल्क भरा.
- अर्ज सबमिट झाल्यावर तो तहसील / राशनिंग कार्यालयात पडताळणीसाठी जातो. निरीक्षक / कार्यालयीन पडताळणीनंतर तुमच्या रेशन कार्ड जारी केले जाते. यामध्ये डिजिटल कॉपी / फिजिकल मिळणं जिल्हा नुसार बदलू शकतं.
हे पण वाचा| रोज फक्त 50 रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल 35 लाख रुपये; काय आहे योजना? जाणून घ्या सविस्तर माहिती
रेशन कार्ड चे कोणकोणते प्रकार असतात?
महाराष्ट्र मध्ये प्रामुख्याने रेशन कार्ड चे तीन प्रकार पडतात. यामध्ये AAY (अत्यंत), PHH (priority household), NPH (NON-priority household) तसेच white ration card असे प्रकार आहेत. तुमचे उत्पन्न कुटुंबाकडे इतर निकष यावर पात्रता ठरते. स्थानिक कार्यालयात अंतिम निर्णय घेतला जातो.
रेशन कार्ड बनवण्यासाठी किती दिवस लागतात?
तुमची कागदपत्र पूर्ण आणि माहिती अचूक असेल तर साधारणपणे 30 दिवसानंतर तुमचे रेशन कार्ड तुम्हाला मिळेल. मात्र हा कालावधी जिल्हा प्रकारानुसार बदलू शकतो. New Ration Card
अर्जाची स्थिती कशी तपासावी?
अर्जाची स्थिती तपासण्यासाठी सर्वप्रथम RCMS लॉगिन मधून तुमचे अर्ज पाहू शकता. तुम्हाला गरज भासल्यास तुम्ही स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधू शकता. याशिवाय ऑफलाइन जिल्हा पुरवठा कार्यालय मध्ये from 1 प्रत्यक्ष अर्जही करता येतो.
रेशन कार्ड हे केवळ कागदाचा तुकडा नसून तुमच्या जीवनातील खूप आवश्यक कागदपत्र आहे. तो घराचा हक्क आहे. आई-वडिलांच्या कष्टाला यश मिळवण्यासाठी सरकारच्या सर्व सवलती खरंच आपल्याला मिळाव्यात यासाठी रेशन कार्ड खूप महत्त्वाचे आहे. कागदपत्र जुळवा दोन तास काढा आणि आजच ऑनलाईन अर्ज करा. पुढच्या महिन्यात कोणाच्या परीक्षेची फी वाचेल कोणाच्या स्वयंपाकांचा खर्च वाचेल.
1 thought on “नवीन रेशनकार्ड घरबसल्या ऑनलाईन कसं काढायचं अन् कोणती कागदपत्रे लागतील? जाणून घ्या सविस्तर”