New Rules | दर पहिल्याच महिन्याला नवीन नियम बदलतात हे आपल्याला सर्वांनाच माहित आहे त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावरती होतो. यामध्ये एलपीजी सिलेंडरचे दर असो बँकेच्या मुदत वाढीत असत किंवा क्रेडिटचे नवीन नियम असो तसेच सोन्याचे खरेदीचे नियम असोत हे सर्व सर्वसामान्याच्या जीवनावरती परिणाम करतात. हे सगळं बद्दल आपल्याला हळूहळू जाणावं लागतात. आता एक सप्टेंबर पासून अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत आणि हे बदल तुमच्यावरचे परिणाम करतील. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर नवीन नियम कोणते लागू होणार आहे. New Rules
SBI क्रेडिट धारकांसाठी महत्त्वाची माहिती
एक सप्टेंबर पासून एसबीआय क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना काही महत्त्वाचे नियम लागू होणार आहेत. बिल पेमेंट, पेट्रोल डिझेल खरेदी किंवा ऑनलाइन शॉपिंग करताना तुम्हाला अतिरिक्त शुल्क द्यावा लागू शकतं. ऑटो डेबिट व्यवहार फेल झाला तर थेट दोन टक्के दंड आकारला जाईल. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय व्यवहारांवर जास्त शुल्क द्यावा लागेल आणि रिवार्ड पॉईंट्स मूल्यही कमी होणार आहे. म्हणजेच, आजवरच्या सोयीने तुम्ही कार्ड वापरत होतात त्यात बदल होणार असून खर्चाचं गणित नीट जुळवावी लागतील.
चांदी खरेदीवर नवा नियम
सोने खरेदी करताना हॉलमार्किंग अनिवार्य झालं, आता चांदीच्या खरेदी विक्रीवरही सरकार नियम कडक करण्याच्या तयारीत आहे. 1 सप्टेंबर पासून चांदीच्या दागिन्यावर हॉलो मार्किंग बंधनकारक होण्याची शक्यता आहे. यामुळे चांदीची शुद्धता सुनिश्चित होईल, पण खरेदीदारांना थोडा आर्थिक खर्च करावा लागेल. गुंतवणूकदारासाठी ही बातमी महत्त्वाची आहे कारण पारदर्शकता वाढेल आणि दरही वाढू शकतात.
मुदत ठेवीवरील व्याजदर
मुदत ठेवी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. सध्या 6.5 ते 7.5 टक्के इतका व्याजदर मिळतोय, पण एक सप्टेंबर नंतर बँका यामध्ये बदल करू शकतात. म्हणजेच व्याजदर घटनेची शक्यता आहे. ज्यांना एफडी करायचे आहे त्यांनी लवकरात लवकर गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. कारण दर बदलले की पुढे कमी व्याज दरावरच समाधान मानाव लागेल.
ATM व्यवहारांवर मर्यादा
काही बँकांनी ATM मधून पैसे काढण्यास संबंधित नव्या नियम लागू करण्याची तयारी केली आहे. ठराविक वेळ मोफत पैसे काढता येतील, पण त्यापेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास अतिरिक्त शुल्क आकारलं जाईल. त्यामुळे डिजिटल व्यवहार प्रोत्साहित होतील आणि ग्राहकांना रोखीच्या व्यवहारांपेक्षा ऑनलाइन पद्धती फायदेशीर ठरतील.
(Disclaimer: वरील दिलेली माहिती प्रसार माध्यमांच्या आधारे आहे ही बातमी फक्त वाचकांसाठी आणि मदत मिळावी यासाठी बनवलेले आहे.)