New Rules: 1 ऑक्टोबर पासून देशभरात नवीन नियम लागू केले जाणार आहे. दैनंदिन जीवनातील अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. रेल्वे प्रवास पेन्शन खाते डिजिटल पेमेंट आणि गॅस सिलेंडरच्या किमतीवर याचा थेट परिणाम होताना दिसणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात सर्वसामान्यांच्या खिशावर आणि दैनंदिन जीवनावर या बदलाचा मोठा परिणाम होत आहे. या लेखांमध्ये आपण कोणत्या नियमांमध्ये काय बदल होणार आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. New Rules
1) रेल्वे प्रवासासाठी नवीन नियम
रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना आता आणखीन एक महत्त्वाचा नवीन नियम पाळावा लागणार आहे. १ ऑक्टोबर पासून ऑनलाईन तिकीट बुकिंग मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत तात्काळ बुकिंग साठी लागू असलेले सर्व नियम आता सर्वसाधारण आरक्षणालाही लागू होणार आहेत. आता आरक्षण सुरू झाल्यानंतर पहिल्या पंधरा मिनिटात फक्त आधार कार्ड व्हेरिफाइड प्रवासीच IRCTC ॲप किंवा वेबसाईटवरून तिकीट बुक करू शकतात. या नियमामुळे दलाली करणाऱ्यांना वर थेट परिणाम होणार आहे. रेल्वे काउंटर वरून तिकीट घेणाऱ्यांना कोणताही बदल नाही.
2) पेन्शन धारकांसाठी नवीन बदल
पेन्शन फंड रेग्युलेटर अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी (PFRDA) ने एक ऑक्टोबर पासून काही शुल्का मध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
- नवीन PRAN उघडताना E–PRAN किड्स साठी 18 रुपये
- फिजिकल कार्ड साठी 40 रुपये
- वार्षिक मेंटेनन्स चार्ज 100 रुपये प्रति खाते
हे शुल्क आता प्रत्येक पेन्शन धारकांना भरावे लागणार आहेत. त्यामुळे पेन्शन खात्यामध्ये व्यवहार करणाऱ्या लोकांना नियोजन करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हे पण वाचा| व्हॉट्सॲपवरून आधार कार्ड कसे डाउनलोड करावे? जाणून घ्या सोपी पद्धत..
3) UPI व्यवहाराबाबत नवीन नियम
आज कालच्या काळात Google pay, phone pay, Paytm यासारख्या ॲपचा वापर करून सर्वसामान्य माणूस डिजिटल पेमेंट करत आहे. मात्र एक ऑक्टोबर पासून डिजिटल व्यवहारांमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) इंडिया व्यवहारावर मर्यादा आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा अर्थ असा की, ते व्यक्ती थेट होणाऱ्या व्यवहारावर काही निर्बंध लागू होऊ शकतात. हे बदल सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात येणार असून, एक ऑक्टोबर पासून याबाबत निर्णय लागू होण्याची शक्यता आहे.
4) गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल
तुम्हा सर्वांना तर माहीतच असेल प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती जाहीर होतात. गेल्या काही महिन्यांपासून घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती स्थिर आहेत. त्यामुळे एक ऑक्टोबर पासून गॅसच्या नवीन किमती जाहीर होणार आहेत. व्यवसायिक गॅसच्या किमतीत सातत्याने बदल होत असला तरी घरगुती 14 किलोच्या गॅस सिलेंडर कोणताही बदल झालेला नाही. पण आता ऑक्टोबर महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

1 thought on “1 ऑक्टोबर पासून लागू होणार हे 4 नवीन नियम! रेल्वे तिकीट, पेंशन, UPI व गॅस सिलिंडरच्या किमतीत होणार बदल”