1 सप्टेंबरपासून या 4 नियमात होणार मोठा बदल! याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार


New Rules Update: सप्टेंबर महिना सुरू होताच अनेक महत्त्वाच्या नियमात बदल होणार आहेत. रोजच्या छोट्या-मोठ्या खर्चावर आणि बचतीवर याचा थेट परिणाम होणार आहे. म्हणूनच एक सप्टेंबर पासून लागू होणारे हे नियम जाणून घेणे फार आवश्यक आहे. कारण यामध्ये दागिने बँक व्यवहार एलपीजी गॅस सिलेंडर आणि एटीएम व्यवहार या सगळ्यांचा समावेश आहे. या सर्व बाबी दैनंदिन जीवनात अती आवश्यक आहेत.

चांदीच्या दागिन्यावर नवीन नियम

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये लग्न असलं तर दागिने खरेदी करण्याची परंपरा आहे. यामध्ये चांदीचे पटके पैजण तांत भाड्यांना खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते. पण अनेक वेळा शुद्धतेच्या बाबतीत शंका निर्माण होते. आता एक सप्टेंबर पासून चांदीच्या दागिन्यावर हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आली आहे. एक सप्टेंबर पासून सोन्याप्रमाणे चांदीच्या दागिन्यावर देखील ग्राहकांना verified HUID फीचर वापरून दागिन्याची शुद्धता तपासता येणार आहे. म्हणजेच आता बनावट चांदीचे दागिने घेऊन फसवणूक होण्याचा धोका कमी होणार आहे.

SBI क्रेडिट कार्डधारकांसाठी मोठा बदल

आज-काल ऑनलाईन खरेदी वीस बिल भरणे अगदी पेट्रोल पंपावरही क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पण आता एक सप्टेंबर पासून एसबीआय क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे.

हे पण वाचा| पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट RD योजनेमध्ये ₹6,000 गुंतवा आणि 5 वर्षात मिळवा जबरदस्त नफा

  • ऑटो डेबिट फील झाल्यास थेट दोन टक्के दंड आकारला जाणार आहे.
  • ऑनलाइन शॉपिंग किंवा बिल पेमेंट वर अतिरिक्त शुल्क लागू केल्या जाणार आहेत.
  • आंतरराष्ट्रीय व्यवहारातील शुल्क वाढवण्यात आले आहे.
  • रिझर्व पॉईंट चे मूल्य देखील घसरू शकते.

म्हणजेच खर्च करताना जरा जपून क्रेडिट कार्डचा वापर करणे आवश्यक होणार आहे. योग्य नियोजन करून वापर न केल्यास याचा मोठा तोटा सहन करावा लागू शकतो.

एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल

आपणास माहीतच असेल दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती जाहीर होतात. एक सप्टेंबर रोजी देखील एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती बदलणार आहेत. आपल्या स्वयंपाक घराचा खर्च थेट गॅस सिलेंडरच्या किमतीवर अवलंबून असतो. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरच्या किमती बदलल्या की लगेच किचनचे बजेट देखील बदलते. दर वाढले तर घर खर्च देखील वाढणार आहे आणि दर कमी झाले तर नक्कीच सर्वसामान्य दिलासा मिळणार आहे. New Rules Update

FD व्याजदरात बदल होण्याची शक्यता

तुम्ही देखील तुमच्या भविष्यासाठी बचत करून सुरक्षित पर्याय म्हणून एफडी पर्यायाचा निवड केली असेल. तर तुमच्यासाठी देखील एक सप्टेंबर पासून मोठा बदल होऊ शकतो. सध्या 6.5% व्याजदर दिला जातो यामध्ये वाढ करून 7.5% व्याजदर मिळू शकतो. दरम्यान यात घसरण देखील होऊ शकते. त्यामुळे ज्यांना एफडी करायचे आहे त्यांनी बदलत्या नियमाकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

एटीएम व्यवहारावर अतिरिक्त शुल्क..

एटीएम मधून पैसे काढणे आज प्रत्येकाचे दैनंदिन काम झाला आहे. पण आता बँका काही नवीन नियम लागू करून एटीएम ट्रांजेक्शन वर नवे शुल्क लावणार आहेत. ठराविक मर्यादेपेक्षा जास्त वेळा पैसे काढले तर आता जास्त शुल्क आकारला जाऊ शकतो. त्यामुळे डिजिटल व्यवहार आणि यूपीआय पेमेंटचा वापर केल्यास हा खर्च वाचता येईल.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!