Onion Market: शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवून देणारा कांदा आता शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. कांदा साठवून ठेवला तर सडतोय आणि विकला तर परवडत नाही अशी बिकट अवस्था सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे आणि दमट हवामानामुळे चाळीत साठवून ठेवलेला कांदा सडू लागला आहे. मात्र बाजारात त्याला चांगला भाव मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. आता शेतकऱ्यांना सर्वात मोठा हा प्रश्न पडला आहे की कांद्याचे दर वाढणार का कमी होणार?
मागील काही महिन्यापासून कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. दरवाढीच्या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कांदा साठवला आहे. मात्र आता त्यांच्या या आशेवर पूर्णपणे पाणी फिरले आहे. वातावरणातील ओलाव्यामुळे आणि पावसाच्या उष्णतेमुळे कांद्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. अकोला जिल्ह्यात तीन दिवस झालेल्या पावसामुळे तर अनेक शेतकऱ्यांना सडलेला कांदा फेकून द्यावा लागला आहे. हाता तोंडाशी आलेले पीक फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.
बांगलादेशाच्या आयातबंदीचा फटका कांद्याच्या दरावर
कांद्याचे दर कोसळण्यामागे अनेक कारणे आहेत त्यापैकीच एक महत्त्वाचे कारण म्हणजे ब बांगलादेशाकडून एप्रिल पासून कांद्याच्या आयातीवर घालण्यात आलेली बंदी. हिरवी भारतातून मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होणाऱ्या बांगलादेशाने आयात थांबविल्याने देशांतर्गत बाजारात कांद्याचा साठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कांद्याची मागणी घटल्यामुळे कांद्याचे दर आपोआप घसरले आहेत. कांदा पिकाला येणारा खर्च देखील कांद्याच्या उत्पादनातून निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. Onion Market
हे पण वाचा| सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होणार? सोनं खरेदी करायचा विचार करत असाल तर एकदा नक्की वाचा
सध्या किरकोळ बाजारात कांदा 15 ते 20 रुपये प्रति किलो दराने विकत आहे. तर काही ठिकाणी कांद्याच्या दर्जा नुसार हा दर दहा रुपयापर्यंत ही आला आहे. उत्पादकांना कंट्रोल मागे केवळ 1000 ते 1400 रुपये मिळत आहेत. जे त्यांच्या उत्पादन खर्चही भरून काढण्यासाठी पुरेसे नाहीत. शेतमाल बाजार समितीमध्ये ही चांगल्या कांद्याला जास्तीत जास्त 1200 ते 1600 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या कांद्याचे दर यापेक्षाही खूप कमी आहेत.
निर्यातीची घटती मागणी
केवळ बांगलादेशच नाही तर श्रीलंका आणि मलेशिया यासारख्या पारंपारिक बाजारपेठेतही कांद्याची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे 2024-25 च्या पहिल्या सहामाहीत कांद्याची निर्यात अत्यंत मर्यादित राहिली आहे. ज्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील पुरवठा वाढला आहे. राज्यातील अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी चांगला भाव मिळेल या आशेवर कांद्याची लागवड केली होती आणि दर कमी आहेत म्हणून कांदा चाळमध्ये कांदा भरला होता. कांदा उत्पादन करण्यासाठी व चाळेत टाकण्यासाठी एकूणच शेतकऱ्यांना बराच खर्च झाला होता.
मात्र आता तोच कांदा सडत असल्याने त्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढतच आहे. शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. सध्या तरी पुढील काही दिवसांमध्ये कांद्याच्या दरात वाढ होईल अशी बऱ्याच शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. त्यामुळे त्यांचे डोळे बाजार समितीतील कांद्याच्या दरात होणाऱ्या चढ–उतारा कडे लागले आहे. शासनाने या गंभीर समस्ये कडे लक्ष देऊन कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी काहीतरी उपयोजना आखली पाहिजे अशी अशा शेतकऱ्यांना आहे.
1 thought on “कांद्याचे दर वाढणार का घसरणार? कांदा साठवला तर सडतोय, विकला तर परवडत नाही!”