Onion Market Price: आज राज्यातील कांदा बाजार भाव वाढले का घसरले? वाचा सविस्तर


Onion Market Price: राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कांदा बाजार भावाची बातमी ही शेतकऱ्यांसाठी आणि ग्राहकांसाठी दोघांसाठीही तितकीच महत्त्वाची ठरते. कारण प्रत्येक दिवशी बाजार समितीमध्ये आवक पुरवठ्यानुसार कांद्याचे दर चढ-उतार होत असतात. आज 16 ऑगस्ट रोजी राज्यातील अनेक ठिकाणच्या बाजार समितीमध्ये कांद्याची चांगली आवक झाली असून काही ठिकाणी चांगले दर देखील मिळाले आहेत. तर काही ठिकाणी कांद्याच्या दरामध्ये चढ-उतार होताना दिसत आहे.

आज राज्यभरात एकूण 97 हजार 551 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातच तब्बल 46 हजार 402 क्विंटल कांदा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे लासलगाव बाजारात उन्हाळी कांद्याला किमान 600 रुपये तर सरासरी 1675 रुपये दर मिळाला आहे. याशिवाय पुणे पिंपरी बाजारात लोकल कांद्याला 1300 रुपये सरासरी दर मिळाला आहे. अमरावती फळ व भाजीपाला बाजारात 1550 रुपये सरासरी दर मिळाला आहे. नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला सर्वाधिक १८७५ रुपये सरासरी दर मिळाला आहे. Onion Market Price

एकंदरीत पाहता राज्यातील कांद्याच्या दरात स्थिरता असून काही ठिकाणी दर 1800 ते 2100 रुपयापर्यंत पोहोचले आहेत. मात्र सोलापूर बाजारातील लाल कांद्याचा इमानदार फक्त शंभर रुपये इतका मिळाला असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. दुसरीकडे नागपूर सारख्या बाजारात पांढऱ्या कांद्याला जवळपास दोन हजाराच्या घरात दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खुशी देखील आहे. कांद्याचे दर हा रोजच्या रोज बदलत असतात त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या मालाची विक्री करण्यापूर्वी नेहमी जवळच्या बाजारात कांद्याचे दर काय आहेत हे जाणून घेणे गरजेचे आहे. आजच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की नाशिक नागपूर अमरावती अशा ठिकाणी कांद्याला चांगले भाव मिळत आहेत.

हे पण वाचा| सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी! सोनं झालं स्वस्त, 24 कॅरेट सोन्याचा नवा दर इथं पाहा

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमीदरजास्तीत जास्तदरसर्वसाधारणदर
16/08/2025
कोल्हापूरक्विंटल634550021001200
छत्रपती संभाजीनगरक्विंटल21504001500950
चंद्रपूर – गंजवडक्विंटल310180022002000
विटाक्विंटल40150021002000
सोलापूरलालक्विंटल1862110022001200
धुळेलालक्विंटल49059015001400
नागपूरलालक्विंटल600100018001600
वडूजलालक्विंटल40100020001500
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल30950026001550
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल466450019001200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल15140016001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल71580018001300
मंगळवेढालोकलक्विंटल16102017001450
नागपूरपांढराक्विंटल340150020001875
लासलगाव – विंचूरउन्हाळीक्विंटल818460017801600
सिन्नर – नायगावउन्हाळीक्विंटल93820016201475
कळवणउन्हाळीक्विंटल885040019001300
पैठणउन्हाळीक्विंटल43342016001350
चांदवडउन्हाळीक्विंटल850058018001580
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1980050021261600
साक्रीउन्हाळीक्विंटल1605080018101200
भुसावळउन्हाळीक्विंटल1180012001000
दिंडोरीउन्हाळीक्विंटल130120016161400

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “Onion Market Price: आज राज्यातील कांदा बाजार भाव वाढले का घसरले? वाचा सविस्तर”

Leave a Comment

error: Content is protected !!