Onion Market Update | कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! या काही बाजार समितीमध्ये मिळाला सर्वाधिक दर

Onion Market Update : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील अनेक भागांमध्ये कांद्याच्या बाजारामध्ये मोठी हालचाल झाल्याची पाहायला मिळाली. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव सह मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, धुळे, पुणे, शेवगाव अशा प्रमुख बाजार समितीमध्ये आज कांद्याची आवक आणि दर मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत. दिवसभरात जवळपास सव्वा लाख क्विंटल कांद्याचे आवक झाली. एवढी मोठी आवक होऊनही दर काही ठिकाणी स्थिर, तर काही ठिकाणी झपाट्याने बदलताना दिसले. राज्यातील काही प्रमुख बाजार समितीमध्ये दर काय आहेत हे एकदा जाणून घेऊया.Onion Market Update

लासलगाव बाजारात आज कांद्याला किमान ६०० रुपये दर मिळाला, तर सरासरी भाव १३४० रुपयांवर पोहोचला. पिंपळगाव बसवंत बाजारात किमान ५०० रुपये तर सरासरी १३०० रुपये भाव नोंदवला गेला. नाशिक जिल्ह्यात एकूणच तब्बल ७१ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली आणि त्यामुळे दरावरही परिणाम दिसून आला.

दुसरीकडे सोलापूर बाजारात लाल कांद्याला किमान १०० रुपयांचा दर मिळाला, पण सरासरी १२०० रुपयांपर्यंत चढला. धुळे बाजारात कांद्याला सरासरी १००० रुपये दर नोंदवला गेला. पुणे पिंपरी आणि मंगळवेढा बाजारातही १२०० रुपयांचा भाव नोंदवला. मुंबईच्या कांदा बटाटा मार्केटमध्ये सरासरी दर १३०० रुपयांवर स्थिरावला, तर अकोला बाजारात १२०० रुपये आणि कोल्हापूर बाजारात १००० रुपये सरासरी दर मिळाला.

शेवगाव बाजारात तर नंबर वनच्या कांद्याला तब्बल १३७५ रुपयांचा भाव मिळाला, तर नंबर दोन कांद्याला ९५० रुपये भाव लागला. याशिवाय विटा, सांगली, कराड, वाई अशा बाजारांमध्ये कांद्याला चांगला प्रतिसाद मिळाला. कराड बाजारात हालवा जातीला १६०० रुपयांचा स्थिर भाव मिळाला, तर वाई बाजारात १८०० रुपयांचा सरासरी दर नोंदवला गेला.

आज दिवसभरात बाजारात येणाऱ्या प्रत्येक घडामोडीवर शेतकरी आणि व्यापाऱ्यांची नजर होती. कारण कांद्याच्या आवक-भावावरून पुढील आठवड्याचा कल ठरणार आहे. शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी चांगला दर मिळेल तिकडे माल सोडण्याचा विचार सुरू आहे. तर व्यापाऱ्यांना आवक मोठी असल्याने पुढील काही दिवस दरात चढ-उतार होऊ शकतात अशी भीती आहे.

(वरील दिलेली माहिती ही सरकारी वेबसाईटच्या आधारे आहे.)

हे पण वाचा| कांद्याचे दर वाढणार का घसरणार? कांदा साठवला तर सडतोय, विकला तर परवडत नाही!

Leave a Comment

error: Content is protected !!