PAN Card Loan : तुमच्या पॅन कार्ड वरती कोणी कर्ज घेतल आहे का? या पद्धतीने चेक करा


PAN Card Loan : गाव असो किंवा शहर आता प्रत्येक आर्थिक व्यवहारांमध्ये एक दस्तावेज महत्त्वाचे बनले आहे ते म्हणजे पॅन कार्ड. हे दस्तावेज आता गरीब असो किंवा श्रीमंत सर्वांसाठी खूप महत्त्वाचे आहे. परंतु या पॅन कार्डचा आपल्याला योग्य प्रकारे उपयोग करता येत नाही आणि लुटणारे या दस्ताऐवज द्वारे आपला उपयोग करतात. हे दस्तावेज तुमच्यावरती संकट आणू शकतो जर तुमच्या नावावरचे पॅन कार्ड वापरून कोणी कर्ज घेतलं तर तुम्हाला मोठी भरपाई करू लागू शकते. कारण कर्ज तुमच्या नावावर, पण त्याचा उपयोग कोणीतरी दुसरच घेतोय. ही फसवणूक आता वाढत चाललेली आहे, पण थोडी काळजी घेतली, तरी या जाळ्यात अडकणार नाही ही अडचण टाळता येऊ शकते. PAN Card Loan

या पद्धतीने ओळखा तुमच्या नावावरती कोणी कर्ज घेतले का?

तुमच्या नावावरती कुठलं कर्ज आहे का? कोणत्या बँकेकडून आहे, कधी घेतला आहे, किती भरलं सगळं क्रेडिट रिपोर्ट असतं. भारतामध्ये CIBIL, Equifax, Experian, CRIF Highmark अशा चार मोठ्या क्रेडिट ब्युरो आहेत. यांच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही फुकटात तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासू शकता. वेबसाईटवर नाव, जन्मतारीख, पॅन क्रमांक आणि मोबाईल नंबर टाका. नंतर आलेला ओटीपी टाका आणि रिपोर्ट पहा काय काय कर्ज आहे ते सगळं दिसेल.

पॅनवर कर्ज घेतला असेल हे कसं कळेल?

असा कुठला लोन दाखवत असेल जो तुम्ही कधी घेतलाच नाही, बँकेकडून लोन इंक्वायरी दाखवत असेल, पण तुम्ही अर्जच केला नसेल, बँकेचे नाव किंवा रक्कम विचित्र वाटत असेल तर त्वरित याची खात्री करा.

जे कर्ज दिसतंय त्या संस्थेला कळवा की हे कर्ज तुम्ही घेतलेला नाही, आधार, पॅन कार्ड, प्रतिज्ञापत्र देखी लोन तुम्ही घेतलं नाही. जवळच्या सायबर सेलमध्ये जाऊन किंवा ऑनलाईन अर्ज तक्रार करता येते. रिपोर्ट मध्ये चुकीचं लोन दिसत असेल तर त्यांनाही लेखी तक्रार करा.

त्यामुळे तुमचं पॅन कार्ड अनोळखी वेबसाईट किंवा मेसेज वरती शेअर करू नका. पॅन कार्ड हरवलं तर तक्रार दाखल करा आणि नवीन साठी अर्ज करा. दर तीन-चार महिन्यांनी क्रेडिट रिपोर्ट तपासा ऑनलाइन व्यवहार करताना मजबूत पासवर्ड ठेवा.

अशाच माहितीसाठी आम्हाला फॉलो करत चला तसेच ही माहिती आम्ही प्रसार माध्यमातून दैनंदिन घडणाऱ्या फसवणुकीच्या आधारे बनवलेले आहे. जर तुमच्या पॅन कार्ड वरती असंच कुणी कर्ज घेतल असेल तर लगेच तक्रार दाखल करा.

हे पण वाचा |Pan Card हरवलय का? चिंता नको! ऑनलाइन डुप्लिकेट पॅन कार्ड साठी अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत जाणून घ्या

1 thought on “PAN Card Loan : तुमच्या पॅन कार्ड वरती कोणी कर्ज घेतल आहे का? या पद्धतीने चेक करा”

Leave a Comment

error: Content is protected !!