Panjabrao Dakh Havaman Andaj: राज्यात मागील काही दिवसापासून जोरदार पाऊस होत आहे. शेतकऱ्यांसोबत सर्वसामान्य नागरिकांनाही प्रश्न पडला आहे. की हा पाऊस अखेर कधी संपणार. याच पार्श्वभूमीवर हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी आपला नवीन अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर असाच कायम राहणार असून काही भागात मुसळधार ते काही भागात अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
पंजाबराव डख यांच्या म्हणण्यानुसार, 23 आणि 24 सप्टेंबर रोजी दिवसा ऊन पडेल आणि रात्रीच्या वेळी पाऊस जोर धरील. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अशीच परिस्थिती कायम राहणार आहे. उत्तर महाराष्ट्रात सुद्धा दिवसा ऊन आणि रात्री पावसाची शक्यता वर्तवली आहे. विदर्भात अधून मधून पावसाचे आगमन होईल. या पावसात पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.
राज्यात पुढील दोन दिवस म्हणजे 25 आणि 26 सप्टेंबरला पावसाचा जोर थोड्या प्रमाणात कमी होईल. आकाशात चांगला सूर्यप्रकाश दिसेल आणि वातावरण काही प्रमाणात कोरडे राहील. यादरम्यान शेतकरी आणि नागरिकांना थोडा दिलासा मिळणार आहे. मात्र 27 सप्टेंबर पासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये रिमझिम पाऊस पडेल तर काही ठिकाणी नदी, ओढे, नाले तुडुंब भरून वाहतील. अनेक भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा| नवरात्रनिमित्त महिलांसाठी मोठी भेट! मोदी सरकारकडून 25 लाख मोफत एलपीजी कनेक्शन दिले जाणार
नांदेड, परभणी, लातूर, जालना, बीड, धाराशिव, अहमदनगर, सातारा, पुणे, जळगाव, नाशिक, मुंबई आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये विशेषता पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात राहील असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. या भागातील नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. आपले जनावरे नदीकाठीला चालण्यासाठी घेऊन जाऊ नये किंवा नदीकाठी बांधू नये. अचानक नदीला पूर येण्याची शक्यता देखील आहे.
दसऱ्यानंतर हवामान होणार कोरडे
शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी एकच बातमी आहे ती म्हणजे, 30 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत राज्यात हवामान कोरडे राहणार आहे. यामुळे सोयाबीन काढणीला वेळ मिळेल. पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे की, दुपारी सोयाबीन काढून वाळल्यानंतर लगेच झाकून ठेवा कारण रात्री पाऊस होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमची सोयाबीन वयाला जाऊ शकते. Panjabrao Dakh Havaman Andaj
शेवटचा पाऊस
मान्सूनचा शेवटचा हा पाऊस काही ठिकाणी वरदान तर काही ठिकाणी डोकेदुखी ठरू शकतो. शेतीसाठी पाऊस आवश्यक असला तरी जास्त पावसामुळे शेती पिकाच्या मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील पुढील दोन-तीन दिवस ऊन पावसाचा खेळ सुरूच राहील. थोडक्यात दिलासा मिळाला असला तरी महिन्याच्या शेवटी पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. मात्र दसऱ्यानंतर हवामान कोरडे होणार आहे.

1 thought on “राज्यातील या भागात अति मुसळधार पावसाची शक्यता! पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज”