Panjabrao Dakh Rain Alert: राज्यातील शेतकरी पेरणीसाठी पावसाचा अंदाज घेत आहेत. संपूर्ण राज्यातील नागरिकांचे डोळे सध्या आकाशाकडे लागले आहेत. राज्यात मागील काही दिवसापासून धो धो बरसणारा पाऊस शेतकऱ्यांची चिंता वाढवत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी वापस्याची वाट पहावी लागत आहे. राज्यात मान्सून यावेळेस लवकर दाखल झाला मात्र काही काळासाठी मान्सूनने विश्रांती घेतली त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यासाठी थांबण्याचा निर्णय घेतला. मात्र मान्सूनचा पाऊस मागील तीन चार दिवसापासून असा सुरू झाला आहे की शेतकऱ्यांना पेरणीसाठी वेळच मिळत नाही. शेतकऱ्यांनी वापसा न झाल्यास पेरणी केव्हा करावी असा प्रश्न त्यांना पडत आहे.
दरम्यान हवामान विभागाने आणि प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवलेला नवीन अंदाज समोर आला आहे. 12 जून पासून पावसाचा खरा जोर सुरू झाला असून अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजावर महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड विश्वास ठेवतात. त्याचबरोबर डख यांनी वर्तवलेला प्रत्येक हवामान अंदाज खरा ठरतो त्यामुळे यावर्षीशी राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष डक यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजाकडे आहे. दरम्यान पंजाबराव यांनी नवीन हवामानाचा अंदाज वर्तवला आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
हे पण वाचा| गोड तेलाच्या किमतीत होणार मोठी घसरण! सरकारने घेतला मोठा निर्णय; जाणून घ्या सविस्तर…
पंजाबराव डख यांनी यावेळी राज्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. खाली दिलेल्या अकरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये ज्या जिल्ह्यांचा समावेश आहे त्या जिल्ह्यामध्ये पुढील काही दिवसांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
- लातूर
- बीड
- परभणी
- नांदेड
- धाराशिव
- कोल्हापूर
- सांगली
- सातारा
- सोलापूर
- अहिल्यानगर
- छत्रपती संभाजी नगर
राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक वाढणारा असून या ठिकाणी ढगाळ वातावरण विजेचे चमकणे त्याचबरोबर जोरदार वारा आणि मुसळधार पावसाचे वातावरण कायम राहणारा असून, या भागात उघडा वाढण्याची शक्यता डख यांनी वर्तवला आहे.
हे पण वाचा| सोन्याचे दर गगनाला भिडले..! ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ; जाणून घ्या आजचे 10 ग्रॅम सोन्याचे दर
विदर्भासाठी महत्त्वाचा इशारा
पंजाबराव डख यांनी विदर्भातील नागरिकांसाठी व शेतकऱ्यांसाठी एक वेगळा आणि अधिक महत्त्वाचा अंदाज दिला आहे. त्यांच्या मते 15 ते 20 जून या कालावधीमध्ये पूर्व आणि पश्चिम विदर्भात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. या पावसामुळे खालील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खालील जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी सतर्क राहून डख यांचा हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. Panjabrao Dakh Rain Alert
- बुलढाणा
- अमरावती
- वाशिम
- यवतमाळ
- हिंगोली
- जळगाव
- नंदुरबार
- धुळे
- नाशिक
या भागामध्ये काही ठिकाणी नदी नाली आणि वडे तुडुंब भरून वाहण्याची शक्यता आहे. ज्यामुळे या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. या भागामध्ये पूर्जन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते असा गंभीर इशारा देण्यात आला आहे.
हे पण वाचा| पोस्ट ऑफिस ची भन्नाट योजना! फक्त 5 वर्षाच्या गुंतवणुकीवर मिळणार 2.24 लाखांचा फायदा..
पंजाबराव डख यांचे महत्त्वाचे आवाहन
या वादळी पावसाच्या आणि अतिवृष्टीच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी व नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी. त्याचबरोबर आपल्या जनावरांची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पंजाबराव डख यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी काही खास सूचना दिल्या आहेत.
- पावसामध्ये झाडाखाली उभा राहू नका: पावसामध्ये शेतकऱ्यांनी किंवा सर्वसामान्य नागरिकांनी कोणत्याही झाडाखाली उभा राहू नये कारण विजेच्या कडकडाट पाऊस येत असल्यामुळे झाडाखाली थांबणे धोकेदायक ठरू शकते. त्यामुळे सुरक्षित ठिकाणी आश्रय घेणे गरजेचे आहे.
- जनवारे झाडाखाली बांधू नका: शेतकऱ्यांनी आपली पाळीव जनावरे किंवा गुरढोरे झाडाखाली बांधणे टाळावे. कारण विजेचा धोका असल्यामुळे जनावरांना इजा होण्याची शक्यता आहे.
- पावसाचा अंदाज घेऊन पेरणीसाठी योग्य निर्णय घ्या: तुमच्या भागात पुरेसा आणि चांगला पाऊस झाल्याची खात्री झाल्यानंतर पेरणीचा निर्णय घ्या. जेणेकरून तुमच्यावर दुबार पेरणीची वेळ येणार नाही.
एकंदरीत पंजाबराव डख यांचा हा अंदाज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा व दिलासादायक ठरत आहे. राज्यातील अतिवृष्टीचा धोका असलेल्या जिल्ह्यांमध्ये सर्वांनीच स्वतःची व आपल्या परिवाराची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. निसर्गाच्या या बदलांना सामोरे जाण्यासाठी आपण सज्ज राहणे महत्त्वाचे आहे.
1 thought on “पंजाबराव डख यांचा नवीन अंदाज! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा; पहा जिल्ह्यांची यादी..”