Pm Kisan Yojana 20th Hapta | देशभरातील शेतकरी बांधवांसाठी एक अपडेट समोर आलेली आहे. जर तुम्ही देखील मोठ्या उत्साहवा मध्ये पी एम किसान योजनेच्या हप्त्याची वाट पाहत असाल परंतु त्यापूर्वी एक तुमच्यासाठी शासनाने मोठा इशारा जाहीर केलेला आहे त्यामुळे ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. 20वा हप्ता मिळणार हे नक्की खरं आहे, परंतु या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली जात असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने एक जबरदस्त सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. Pm Kisan Yojana 20th Hapta
सरकारचा थेट इशारा !
केंद्र सरकारच्या PM किसान योजनेचे अधिकृत सोशल मीडिया वरती एक महत्त्वाचा आव्हान करण्यात आलेला आहे. Pm किसान च्या नावावर खोट्या वेबसाईट, मेसेज आणि फोन कॉल द्वारे फसवणूक सुरू आहे. कृपया यापासून सावध रहा, असा इशारा देण्यात आलेला आहे.
शेतकरी बांधवांनी फक्त अधिकृत वेबसाईटची वापर करावा त्याचबरोबर काही सोशल मीडिया हँडल आहे त्याचा देखील वापर करावा असं अपडेट देण्यात आलेला आहे.
या व्यतिरिक्त कोणी जरी लिंक पाठवत असेल, हप्ता मिळण्यासाठी ओटीपी मागत असेल, बँक डिटेल्स विचारत असेल तर अशा गोष्टींपासून दूर राहा. सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की, हप्त्याचे पैसे थेट DBT द्वारे खात्यावरती जमा केले जातात, कोणतीही प्रक्रिया शेतकऱ्यांनी स्वतःहून करायची गरज नाही.
सध्या सोशल मीडिया वरत शेतकऱ्यांना फसवण्यासाठी अनेक जाळी रचले जात आहे. पीएम किसान चे फोन मेसेज लिंक पाठवून फसवणूक करणारे खूप झालेले आहेत त्यामुळे सरकारने देखील यावरती लक्ष ठेवावे आणि शेतकऱ्यांनी देखील शासनाच्या वेबसाईटचाच वापर करावा.
20 वा हप्ता कधी?
सध्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून देखील अनेक प्रश्न विचारले जात आहे, केंद्र सरकारकडून 20 वा हप्ता जुलै च्या शेवटी किंवा ऑगस्ट च्या सुरुवातीला येण्याची शक्यता आहे. पण अजून देखील अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही. त्यामुळे फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहणे गरजेचे आहे.