Pm किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी गुड न्यूज! शेतकऱ्यांच्या खात्यावरती ₹2000 जमा झाले? तुम्हाला आले का चेक करा


Pm Kisan Yojana 20th installment News | देशभरातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, एकंदरीतच गेल्या चार महिन्यापासून ज्या दिवसाचा तुम्ही वाट पाहत होता तो दिवस आज उगवला आहे. म्हणजे शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा आज 20 वा हप्ता मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 2 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ( Pm Kisan Yojana) अंतर्गत 20 वा हप्त्याची रक्कम थेट बँक खात्यात ट्रान्सफर करणार आहेत. यावेळेस तब्बल 9.7 कोटी शेतकऱ्यांना एकूण ₹20,500 कोटी रुपयांचा लाभ मिळणार असून, प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2000 जमा होणार आहेत. Pm Kisan Yojana 20th installment News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खात्यात पैसे जमा

नरेंद्र मोदी यांच्या खास संसदीय मतदार संघ असलेला वाराणसीतून एक मोठ्या कार्यक्रम अंतर्गत या हप्त्याचे वितरण होणार आहे. सकाळी 11 वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाला पीएम किसान योजनेसोबतच ₹2200 कोटींच्या विविध विकास योजनांचा उद्घाटन देखील करण्यात येणार आहे. यामध्ये शिक्षण, आरोग्य, पर्यटन, क्रीडा, पायाभूत सुविधा अशा अनेक क्षेत्रांचा समावेश आहे. या कार्यक्रमांतर्गत मोदी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत.

खरंतर या योजनेची सुरुवात फेब्रुवारी 2019 मध्ये झाली होती, जेव्हा देशातील छोट्या व अल्पभूधारक शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने ही योजना आणली होती. आतापर्यंत या योजनेतून १९ हप्त्यांमध्ये एकूण 3.69 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती यशस्वीरित्या जमा करण्यात आलेले आहेत. यामध्ये पहिले हत्यांमध्ये 3.16 कोटी शेतकऱ्यांना ₹6324 कोटी रुपये मिळाले होते, तर 19 व्या हप्त्यात तब्बल 10.06 कोटी शेतकऱ्यांना ₹23,500 कोटी रुपये वाटप करण्यात आले होते.

आज दोन हजार रुपयांचा हप्ता मिळणार

सकाळी अकरा वाजता वाराणसी मधून या हप्त्याचा शुभारंभ होणार आहे. त्यामुळे दुपारनंतर बहुतांश बँक खात्यात ₹2000 ची रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल. पीएम किसान पोर्टलवर तुमचं नाव आणि टेटस पाहून तुम्ही तुमच्या खात्यात पैसे आले का ते तपासू शकता. DBT (Direct Benefit Transfer) पद्धतीने हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत त्यामुळे कुठलीही काळजी करण्याची गरज नाही.

मोदी सरकारने नवीन सरकार स्थापन केल्यानंतर शंभर दिवसातच 25 लाख नवीन शेतकऱ्यांना योजनेत समाविष्ट केला आहे. 30 लाखाहून अधिक प्रलंबित स्व नोंदणी प्रकरणांना ही मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता अधिकाधिक गरजू शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.

सध्याच्या काळात दोन हजार रुपये रक्कम फार मोठी नसली तरी परंतु ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे आहे. सध्या सणासुदीचे दिवस सुरू होणार आहेत, या काळात शेतकऱ्यांसाठी ही मदत खूप महत्त्वाची ठरू शकते श्रावण महिना, बैलपोळा, गणेशोत्सव अशी अनेक सन या महिन्यांमध्ये आहेत. त्यामुळे ही रक्कम शेतकऱ्यांसाठी करत मोठी ठरणार आहे आणि जर तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर पुढची काही अडचण असेल तर नक्कीच आम्हाला मेसेज करून विचारू शकतात. तसेच शेतकऱ्यांनी आपलं बँक खाते आधार लिंक आणि स्टेटस अपडेट ठेवणे गरजेचे आहे. जर काही अडचण आली तर आम्ही तुम्हाला वेळोवेळी मदत करत राहू.

हे पण वाचा | Pm Kisan Yojana 20 व्यां हप्त्याची लाभार्थी यादी! शेतकऱ्यांनो, लाभार्थी यादीमध्ये नाव पहा

Leave a Comment

error: Content is protected !!