दिवाळीपूर्वी पीएम किसान योजनेच्या 21 व्या हप्त्याचे ₹2,000 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता? त्यापूर्वी हे काम करणे आवश्यक..

PM Kisan Yojana 21st Installment: आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. देशात सर्वात जास्त नागरिक शेतीवर अवलंबून आहेत. याच शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही गेल्या काही वर्षापासून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार देत आहे. दर चार महिन्याच्या कालावधीनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट दोन हजार रुपये जमा केले जातात. अशाप्रकारे वर्षात एकूण सहा हजार रुपयाची आर्थिक मदत शेतकऱ्यांना केली जाते. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 20 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. त्यानंतर आता 21 व्या हप्त्याची उत्सुकता सर्वत्र पहायला मिळत आहे.

21 वा हप्ता कधी मिळणार? (When will the 21st installment of PM Kisan Yojana be available?)

पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार याबाबत सरकारकडून अजून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र दिवाळीपूर्वी हा आपला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशाच शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली तर बरं होईल अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

विशेष म्हणजे पंजाब हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकताच आगाऊ हप्ता जमा करण्यात आला आहे. कारण अलीकडच्या महापुरामुळे तिथल्या शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते. अंदाजे 27 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात देखील अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झालेले आहे. आणि त्याचबरोबर सणासुदीचा काळ लक्षात घेता केंद्र सरकारकडून दिलासा मिळू शकतो. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील आगाऊ हप्ता मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

21 वा हप्ता मिळवायचा असेल तर हे काम आवश्यक (If you want to get the 21st installment of PM Kisan Yojana, you must do this work)

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी एक केवायसी पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. अनेक शेतकऱ्यांनी अजूनही ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. ज्यांनी ई केवायसी केलेले नाही त्यांना 21 व्या हप्ता मिळणार नाही. तसेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यासोबत आधार लिंक असणे देखील आवश्यक आहे. जर तुमच्या बँक खात्याला आधार लिंक नसेल तर तुम्हाला 21 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळू शकणार नाहीत. कारण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे पैसे महाडीबीटी द्वारे पाठवले जातात. त्यामुळे तुमच्या बँक खात्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे.

या कारणामुळे हप्ता थांबू शकतो (This may cause the 21st installment to be stopped)

केंद्र सरकारकडून पैसे पाठवताना अनेक वेळा तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागतो. यामध्ये IFSC कोड चुकीचा असणे, खाते बंद असणे, आधार मध्ये चुका असणे, अर्ज करताना चुकीचे कागदपत्रे दिली जाणे या कारणांमुळे तुमचा 21 वा हप्ता थांबू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली सर्व माहिती व्यवस्थित तपासून अपडेट करणे आवश्यक आहे. PM Kisan Yojana 21st Installment

हे पण वाचा| शेतकऱ्यांसाठी पोस्ट ऑफिस ची भन्नाट योजना! फक्त एवढ्या दिवसात गुंतवणूक दुप्पट करते? जाणून घ्या सविस्तर..

तुमच्या खात्यात पैसे आले का नाही कसे तपासावे? (Did the money from the PM Kisan scheme arrive? How to check?)

तुमच्या खात्यात पी एम किसान योजनेचा हप्ता जमा झाला का नाही? तपासले अगदी सोपे आहे. तुम्ही खाली स्टेप फॉलो करून तपासून शकतात.

  • सर्वप्रथम प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • त्यानंतर know your beneficiary status या पर्यायावर क्लिक करा.
  • आधार नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुमचे स्टेटस तपासा.
  • तुमचे नाव beneficiary list मध्ये आहे की नाही शोधा.
  • लाभार्थी यादीत तुमचे नाव असेल तर तुम्हाला पुढील हप्ता मिळेल.

ई–केवायसी कशी करावी? (How to do e-KYC of PM Kisan Yojana?)

केंद्र सरकारकडून या योजनेत पारदर्शकता निर्माण व्हावी व या योजनेचा गैरवापर होऊ नये यासाठी सर्व शेतकऱ्यांना ई केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र अनेक वेळा शेतकऱ्यांना प्रश्न पडतो ई केवायसी नेमकं कशी करावी? अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही खालील स्टेप फॉलो करून घरबसल्या ekyc करू शकतात.

  • सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • त्या ठिकाणी ई–केवायसी पर्याय निवडा.
  • आधार नंबर आणि कॅप्चर कोड टाकून गेट ओटीपी या पर्यायावर क्लिक करा.
  • मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी टाकून सबमिट करा.
  • जर तुम्हाला या पद्धतीने केवायसी करता आले नाही तर तुम्ही जवळील सीएससी सेंटरला भेट देऊन देखील बायोमेट्रिक पद्धतीने केवायसी पूर्ण करू शकतात.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “दिवाळीपूर्वी पीएम किसान योजनेच्या 21 व्या हप्त्याचे ₹2,000 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता? त्यापूर्वी हे काम करणे आवश्यक..”

Leave a Comment

error: Content is protected !!