PM Kisan Yojana 21th Hapta: महाराष्ट्रात आज सकाळपासूनच गावोगावी एकच चर्चा सुरू आहे अरे PM किसान चे दोन हजार आले का रे तुझ्या खात्यात? कारण आज केंद्र सरकारकडून PM किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. PM Kisan Yojana 21th Hapta
काहींच्या मोबाईलला मेसेज येऊ लागलेत, तर काही जण बँकेत किंवा सीएससीवर जाऊन आपापल्या खात्याचा बॅलेन्स तपासतायत. २०१८ पासून सुरू झालेली ही योजना आज लाखो कुटुंबांसाठी खरी मदत ठरतेय. छोटा शेतकरी असो वा सीमांत शेतकरी वर्षात तीन वेळा मिळणारा ६ हजारांचा आधार अनेकांना बियाणं–खत–औषधासाठी वेळच्या वेळी उपयोगी पडतो. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १८ हजार कोटी रुपये देशभरातील ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. तमिळनाडूतील कोईंबतूर येथे ते आज हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू करतील.
तुमच्या खात्यात हप्ता आला का? असे तपासा
गावात बहुतेकजण आज हेच करतायत दोन हजार आले का? तुम्हीही अगदी सहज तपासू शकता.
✔ pmkisan.gov.in या वेबसाइटवर जा
✔ “Farmers Corner” उघडा
✔ “Beneficiary Status / लाभार्थी स्थिती” निवडा
✔ तुमचा आधार नंबर / खाते क्रमांक टाका
✔ “Get Data” करा तेवढ्यात स्क्रीनवर संपूर्ण हप्त्याची माहिती दिसेल. ई-केवायसी पूर्ण असेल, आधार लिंक असेल, खाते अॅक्टिव्ह असेल तर रक्कम खात्यात आपोआप जमा होते.
अनेकांना अजून पैसे आले नाहीत? मग हे करा
बऱ्याचदा गावात नेटवर्क नसते, बँक सर्व्हर डाउन असतो किंवा ई-केवायसीमध्ये एखादी छोटी चूक असते.
अशावेळी पळापळ नको आधी हे करा :
1️⃣ सर्वप्रथम कृषी अधिकारी / लेखापाल यांच्याकडे चौकशी करा
त्यांच्याकडे तुमची नोंद तपासण्याची सुविधा असते.
2️⃣ तक्रार समाधान न झाल्यास PM Kisan हेल्पलाइनवर संपर्क करा:
1800-115-5525
155261
011-24300606
3️⃣ ईमेलने तक्रार पाठवायची असेल तर pmkisan-ict@gov.in ज्यांचं नाव चुकीचं, आधार लिंक नाही, बँक खात्यात त्रुटी आहे, ई-केवायसी पेंडिंग अशा सर्व प्रकरणांत हप्ता येण्यास अडथळे येतात. गावात अनेकदा लोक छोट्या चुका तपासायला विसरतात आणि मग हप्ता थांबतो. योजना सुरू झाल्यापासून 21 हप्ते जमा
२०१९ मध्ये पहिला हप्ता गोरखपूरमध्ये देण्यात आला होता. तेव्हापासून आजपर्यंत २० हप्ते जमा झाले असून आज २१ वा हप्ता थेट खात्यावर जमा होत आहे. सरकारने या योजनेसाठी ७५,000 कोटींचा मोठा निधी ठेवला आहे.
