पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली! ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार 2,000 रुपये?


PM Kisan Yojana: देशातील करोडो शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत. या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. जे शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून पीएम किसान योजनेच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. त्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता अखेर कोणत्या तारखेला जाहीर होणार याबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार २ ऑगस्ट २०२५ रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 20 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा होणार आहेत.

मिळालेले माहितीनुसार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा करणार आहेत. या हप्त्याचा लाभ सुमारे 9.3 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. खरीप हंगामासाठी येणारा खर्च शेतकऱ्यांना पेलत नव्हता, त्यामुळे केंद्र सरकारच्या या 20व्या हप्त्याच्या दोन हजार रुपयांमुळे शेतकऱ्यांना मोठा हातभार लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. PM Kisan Yojana

हे पण वाचा| तुम्हीही नवीन जमीन घेतली आहे का? तर मग तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार का? वाचा सविस्तर

प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजना काय आहे?

देशातील शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. ही मदत वर्षातून तीन समान हफ्त्यांमध्ये म्हणजे चार महिन्याच्या कालखंडानंतर दोन हजार रुपयाच्या स्वरूपात महाडीबीटी द्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते. याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) असे म्हणतात, ज्यामुळे पैशाचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पारदर्शकपणे पोहोच होतो.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून मिळालेल्या पैशाचा उपयोग शेतकरी बी बियाणे, खत खरेदी करणे, शेतीची इतर लहान मोठी कामे करणे किंवा दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी केला जातो. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करून त्यांना आत्मनिर्भर बनवणे हा आहे. शेतकऱ्यांनी 2 ऑगस्ट 2025 ही तारीख लक्षात ठेवावी आणि या दिवशी 20व्या हाताचे दोन हजार रुपये आपल्या बँक खात्यामध्ये जमा झाले का नाही? बँकेत जाऊन तपासावे.

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली! ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार 2,000 रुपये?”

Leave a Comment

error: Content is protected !!