PM Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा दिला जात आहे. दरवर्षी या योजनेअंतर्गत सहा हजार रुपयाची आर्थिक मदत शेतकऱ्यांना दिली जाते. महाडीबीटी द्वारे हा पैसा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. या योजनेअंतर्गत 20 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. शेतकऱ्यांना 21 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. दिवाळीपूर्वी हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र यंदा केंद्र सरकारने काही महत्त्वाची निर्णय घेतल्यामुळे काही शेतकऱ्यांचा हप्ता अडकण्याची शक्यता आहे. जर तुम्ही देखील आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण केली नाही तर तुमचे देखील पैसे रखडू शकतात.
या शेतकऱ्यांचा हप्ता अडकणार
1) एक फेब्रुवारी 2019 नंतर जमीन खरेदी केलेले शेतकरी
सरकारकडून आता या कागदपत्राची सखोल तपासणी केली जाणार आहे. महसूल अधिकारी जागेवर जाऊन कुटुंबाची व जमिनीची माहिती तपासणार आहेत. जर यामध्ये काही गडबड आढळली तर पुढच्या हप्ते थांबवले जातील. एवढेच नाही तर आत्तापर्यंत मिळालेली रक्कम देखील परत मागितली जाऊ शकते. PM Kisan Yojana
2) E–kyc न केलेले शेतकरी—
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा व या योजनेत पारदर्शकता निर्माण व्हावी यासाठी सरकारने सर्व लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी करणे बंधनकारक केले होते. मात्र अजूनही काही शेतकऱ्यांनी आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. अशा शेतकऱ्यांना 21वा हप्ता मिळणार नाही.
हे पण वाचा | ‘लाडकी बहीण’ योजनेची e-KYC करताना OTP येत नाही? ही सोपी पद्धत वापरा आणि केवायसी पूर्ण करा
3)आधार कार्ड बँक खात्याशी लिंक न केलेले शेतकरी—
पी एम किसान योजनेचे पैसे महाडीबीटी द्वारे थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले नसेल तर हे पैसे पाठवण्यास अडचण निर्माण होते. त्यामुळे बँक खात्यासोबत आधार लिंक असणे आवश्यक आहे.
पीएम किसान योजनेच्या लाभार्थी यादी तुमचे नाव आहे का?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी यादीत तुमचे नाव आहे का नाही ये तपासण्यासाठी तुम्हाला खालील सर्व स्टेप फॉलो कराव्या लागतील.
- सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
- त्या ठिकाणी beneficiary status या पर्यायावर क्लिक करा.
- आधार नंबर मोबाईल नंबर किंवा बँक खाते क्रमांक टाका.
- Get data या पर्यावर क्लिक करा तुमच्या स्क्रीनवर सर्व माहिती दिसेल.
21 वा हप्ता कधी मिळणार?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 21 वा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न पडला आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार 21 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता जमा केला जाऊ शकतो. असं झाल्यास शेतकऱ्यांना दिवाळीसाठी लागणाऱ्या खर्चाला हातभार मिळेल. खत बियाणे घरगुती खर्च आणि सणासाठी ही रक्कम उपयोगी ठरू शकते. मात्र सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे फक्त पात्र शेतकऱ्यांनाच या योजनेचा हप्ता मिळणार आहे.

1 thought on “PM Kisan Yojana: ‘या’ शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता मिळणार नाही! सरकारचा मोठा निर्णय”