PM Kisan Yojana: PM किसान योजनेचा 21 वा हप्ता कधी मिळणार? आली महत्त्वाचे अपडेट समोर…


PM Kisan Yojana: शेतकऱ्यांच्या खिशाला थोडासा आधार मिळावा यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2019 साली सुरू झालेल्या या योजनेमुळे देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या घरात दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान हफ्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत 20 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्या असून आता सगळ्यांचे लक्ष 21 वा हप्ता कधी येणार याकडे लागले आहे.

21 वा हप्ता कधी मिळणार?

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर डिसेंबरच्या सुमारास 21 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो. पेरणी नांगरणी खत औषध खरेदी या सगळ्या बाबींचे ओझं सध्या शेतकऱ्यांच्या खांद्यावर आहे. अशावेळी नैसर्गिक आपत्तीचा आणखीन भर यामध्ये पडतो. अशावेळी शेतकऱ्यांना सरकारकडून आर्थिक मदतीची अपेक्षा असते. त्यामुळे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत मिळणारा निधी शेतकऱ्यांच्या जीवनात अतिशय मोलाची भूमिका बजावतो. PM Kisan Yojana

हे पण वाचा| 1 सप्टेंबरपासून या 4 नियमात होणार मोठा बदल! याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार

सरकारची नवी तयारी

दरम्यान या योजनेअंतर्गत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मागील हप्त्याच्या वेळी अनेक शेतकऱ्यांचे पैसे अडकले होते. काही शेतकऱ्यांचे आधार लिंक नसल्यामुळे तर काही शेतकऱ्यांची केवायसी अपूर्ण असल्यामुळे, तर काही जणांची बँक माहिती चुकीची असल्यामुळे हप्ता मिळू शकला नाही. यावेळी अशीच अडचण पुन्हा होऊ नये म्हणून सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या योजनेचे गावोगावी शरीर राबवून बँक अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांची माहिती दुरुस्त करणार आहेत. ज्या शेतकऱ्यांनी अजून केवायसी केले नाही किंवा ज्यांच्या खात्यात तांत्रिक अडचणी आहेत त्या सुधारून त्यांना या योजनेचा लाभ मिळण्याची संधी दिली जाणार आहे.

शेतकऱ्यांसाठी दिलासा

आर्थिक अडचणी असल्यामुळे पैशाची गरज या योजनेमुळे भागवता येते. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतो. पण जर माहिती चुकीची असून दुरुस्त केली नाही तर तो हप्ता अडकण्याचे कारण ठरू शकतो. थोडक्यात 21 वा हप्ता लवकरच खात्यात येणार आहे मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना थोडीशी काळजी घ्यावी लागणार आहे. आवश्यक सर्व बाबी काळजीपूर्वक अपडेट ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत वीस हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. शेतकऱ्यांना खरी पैशाची गरज पेरणी असो किंवा फवारणी खत बी खरेदी दरम्यान भासते. अशाच शेतकऱ्यांच्या हातात केंद्र सरकार अंतर्गत या योजनेचे दोन हजार रुपये मिळाले की शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटते. सरकारकडून मदतीचा हात पुढे आल्यानंतर शेतकरी पुन्हा नवीन जोमाने शेती करण्यास तत्पर होतात. त्यामुळे सरकारने देखील 21 वा हप्ता जमा करण्यास विलंब न करता वेळेत शेतकऱ्यांना हा हप्ता द्यावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांच्या वतीने वर्तवली जाते.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!