Pm Svanidhi Yojana: केंद्र शासनाच्या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. तुम्ही देखील छोटा मोठा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल आणि भांडवल तुमच्याकडे नसेल तर केंद्र सरकार अंतर्गत एक महत्त्वाची योजना राबविण्यात येत आहे ती म्हणजे पीएम स्व निधी योजना या योजनेअंतर्गत व्यवसाय करण्यासाठी छोटा भांडवल उपलब्ध करून दिला जातं . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये पीएम स्वनिधी योजनेला मुदतवाढ आणि फेर रचना करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता ही योजना 31 मार्च 2030 पर्यंत लागू राहणार असून, यासाठी तब्बल ₹7332 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. Pm Svanidhi Yojana
काय आहे Pm Savnidhi योजना ?
कोरोना काळामध्ये सुरू झालेल्या या योजनेतून रस्त्यावरती विक्रेती यांना कर्ज क्रेडिट कार्ड आणि कॅशबॅक सुविधा दिली जाते. या मागचा उद्देश म्हणजे त्यांना आत्मनिर्भर बनवणे, डिजिटल व्यवहारांना चालना देणे आणि उद्योजकता वाढवणे.
योजनेतील नवे बदल
या योजनेमध्ये पहिल्या टप्प्यात आधी दहा हजार रुपये कर्ज मिळण्याचा आता ते वाढून 15000 रुपये करण्यात आल आहे. दुसऱ्या टप्प्यांमध्ये वीस हजार रुपये कर्ज मिळायचं ते आता वाढून 25000 रुपये होणार आहे. आणि तिसऱ्या टप्प्यात कर्ज मर्यादा 50 हजार रुपये आहे. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच कॅशबॅक स्कीम डिजिटल व्यवहारांवर 1600 रुपये पर्यंत कॅशबॅक.
30 जुलै 2025 पर्यंत 96 लाख कर्ज प्रकरण एकूण कर्ज वितरण 13, 797 कोटी लाभार्थ्यांची संख्या 68 लाख. 47 लाख सक्रिय विक्रेत्यांनी डिजिटल व्यवहारात ₹241 कोटी कॅशबॅक मिळवला.
या योजनेमध्ये आणखी मुदतवाढ होणार आहे 50 लाख नवीन विक्रेते या योजनेमध्ये सामील होणार एकूण 1.15 कोटी लोकांपर्यंत ला पोहोचला फेरीवाल्यांना आर्थिक मदत उद्योजकता आणि डिजिटल व्यवहारांचा फायदा होईल.
हे पण वाचा | PAN Card Loan : तुमच्या पॅन कार्ड वरती कोणी कर्ज घेतल आहे का? या पद्धतीने चेक करा