PM Ujjwala Yojana Anudan | देशभरातील गॅस सिलेंडर धारकांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. जर तुम्ही देखील केंद्र सरकारच्या पीएम उज्वला (PM Ujjwala Yojana) योजनेचे लाभार्थी असाल तर बातमी नक्की वाचा. कारण केंद्र सरकारने मध्यमवर्गी आणि गरीब कुटुंबांना एक मोठा हातभार लावलेला आहे. पंतप्रधान उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी केंद्र सरकारकडून एक मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आलेला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 2025- 26 या आर्थिक वर्षासाठी तब्बल 12 हजार कोटी रुपयांच्या गॅस अनुदानालाही हिरवा कंदील देण्यात आला असून, देशातील 10.33 कोटी कुटुंबांना याचा लाभ होणार आहे. PM Ujjwala Yojana Anudan
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमुखाने मंजूर झाला. अधिकृत माहितीनुसार, आता उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी नऊ गॅस सिलेंडर प्रत्येकास तीनशे रुपयांचे अनुदान मिळणार आहे. यामुळे एका कुटुंबाला वर्षाभरात एकूण 2700 रुपयांची थेट आर्थिक मदत होणार आहे.
मे 2026 पासून लाखो घरांना याचा लाभ होणार आहे, प्रधानमंत्री उज्वला योजना मे 2016 मध्ये सुरू करण्यात आलेली होती. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट गरीब कुटुंबातील प्रौढ महिलांना मोफत एलपीजी कनेक्शन देऊन स्वच्छ इंधनाचा वापर वाढवणे आणि धुरमुक्त स्वयंपाक घर तयार करणे हे होतं. एक ऑगस्ट 2025 पर्यंत देशभरातील 10.33 कोटी गॅस कनेक्शन दिलं गेलं असून, ग्रामीण आणि आदिवासी भागात याचा मोठा फायदा झाल्याचे समोर आला आहे.
एकूणच, सरकारच्या या निर्णयामुळे उज्वला योजनेतील लाखो लाभार्थ्यांना स्वयंपाकाचा गॅस स्वस्त होणार असून, रेशनवरील धान्य प्रमाणेच स्वयंपाक घरातील खर्चात ही दिलासा मिळणार आहे. ग्रामीण भागातील महिला म्हणतात, महागाईच्या काळात सरकारने दिलेला हा आधार खूप मोठा आहे. नाहीतर गॅस भरतांनाच अर्धा पगार संपायचा. केंद्र सरकारची योजना ग्रामीण भागातील नागरिकांसाठी खरंच मोठी आहे.
हे पण वाचा | LPG गॅस सिलेंडर धारकांसाठी महत्त्वाची बातमी! ‘हे’ काम न केल्यास गॅस सिलेंडर मिळणार नाही…
1 thought on “मोठी बातमी ! आता या गॅस सिलेंडर धारकांना मिळणार ₹300 रुपये, वाचा सविस्तर माहिती”