Post Office FD Scheme: सध्याच्या काळात शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे प्रत्येक जण सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असतो. अशा एखाद्या योजनेमध्ये पैसे गुंतवू इच्छित असतो ज्यामध्ये निश्चित व्याज मिळेल. विशेषता जोखीम न घेणाऱ्या पोस्ट ऑफिस एफडी योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. अशातच सोशल मीडियावर पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनेमध्ये दोन लाख रुपयाची एफडी केल्यानंतर पाच वर्षाच्या कालावधीनंतर दोन लाख 78 हजार 813 रुपये मिळतील, असा दावा केला जात आहे. खरंच दोन लाख रुपयाचे एफडीवर 78 हजार 813 रुपये निव्वळ व्याज मिळू शकते का? तर याचे उत्तर आहे हो, हे व्याज कसे मिळवायचे याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
पोस्ट ऑफिस एफडी योजनेला National saving time deposit scheme असे म्हटले जाते. यामध्ये वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळ्या व्याजदर दिला जातो. सध्या पाच वर्षासाठी व्याजदर 7.5% वार्षिक दिला जात आहे. हे व्याज कंपाऊंड केले जाते म्हणजेच प्रत्येक तीन महिन्यांनी हे व्याज तुमच्या मूळ रकमेत मिळवले जाते. ज्यामुळे तुमची रक्कम वाढून त्या रकमेवर पुन्हा पुढील तीन महिन्यासाठी जास्त व्याज मिळते. यामुळे पाच वर्षानंतर तुम्हाला चांगला रिटर्न मिळू शकतो.
चला तर मग जाणून घेऊया फक्त दोन लाख रुपयाची एफडी करून पाच वर्षानंतर कसे तुम्ही 78 हजार 813 रुपये निव्वळ व्याजातून नफा मिळू शकतात. त्याचा सर्व हिशोब सविस्तर या ठिकाणी आपण पाहूया. पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये व्याज तिमाही आधारावर कंपाऊंड केले जाते. म्हणजेच प्रत्येक तीन महिन्यात तुमचा व्याज मूळ रकमेत जोडले जाते त्यामुळे पाच वर्षानंतर एकूण फायदा 78 हजार 813 मिळतो.
हे पण वाचा| पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये फक्त 400 रुपये गुंतवणूक करा आणि 70 लाख रुपये मिळवा
ही योजना तुमच्यासाठी योग्य ठरू शकते का? असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर नक्कीच ही योजना तुमच्यासाठी योग्य आहे. जर तुम्ही असे गुंतवणूकदार आहात जे रोजच्या बाजारातील चढउतार सहन करू शकत नाहीत आणि फक्त तुमची रक्कम निश्चित वेळेत परत मिळावी अशी इच्छा असेल. तर ही योजना तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. पोस्ट ऑफिस योजना तुमच्यासाठी एकदम योग्य पर्याय ठरू शकते. पोस्ट ऑफिस एफडी योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळील पोस्ट ऑफिस मध्ये जावे लागेल. तेथे तुम्हाला पॅन कार्ड आधार कार्ड आणि एक फोटो घेऊन तुमचे खाते उघडावे लागेल. तुम्ही कोणत्याही बँक अकाउंट मधून पैसे ट्रान्सफर करून किंवा रोख रक्कम देऊन एफडी करू शकता.
पोस्ट ऑफिस एफडी योजनेमध्ये आणखीन एक खास फायदा दिला जातो. तो म्हणजे तुम्हाला कर सवलत दिली जाते. या योजनेमध्ये टीडीएस कापला जात नाही जर तुम्ही पाच वर्षाची एफडी केली तर from 15G/15 H भरला तर हा फायदा तुम्हाला मिळू शकतो. जर तुम्ही देखील पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करू इच्छित असाल तर नक्कीच तुम्हाला या योजनेअंतर्गत मोठा फायदा होऊ शकतो. Post Office FD Scheme
तुमच्या भविष्यासाठी पैशाची बचत करू इच्छित असाल तर नक्कीच या योजनेत पैसे गुंतवण्यास सुरुवात करा. तुमचे दोन लाख सुरक्षित गुंतवणुकीत ठेवावे जिथे हमी असेल सरकारी योजना असेल आणि चांगला व्याजदर मिळत असेल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिस एफ डी योजना एक उत्तम पर्याय ठरू शकतो. पाच वर्षानंतर तुम्हाला एकूण रक्कम दोन लाख 78 हजार 813 रुपये मिळणार आहे. कारण ते सरकारी व्याजदरावर आधारित आहे जे वेळोवेळी बदलत जरी असले तरी तुम्हाला या योजनेअंतर्गत एवढी रक्कम मिळू शकते. जर तुम्ही मोठ्या जखमीपासून दूर राहू इच्छित असाल तर हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.