पोस्ट ऑफिसची खास योजना! फक्त एवढे पैसे गुंतवा आणि दरमहा मिळवा 5,500 रुपयाचा लाभ

Post Office Monthly Income Scheme: वाढत्या महागाईच्या काळात प्रत्येकाला आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित ठेवावे असं वाटतं. यामध्ये कोणाला मुलांच्या शिक्षणाची चिंता असते तर कोणाला त्यांच्या लग्नाची चिंता असते. काही जणांना म्हातारपणी त्यांच्या स्वतःसाठी थोडीफार रक्कम साठवून ठेवायचे असते. म्हणूनच लोक वेगवेगळ्या योजनेत गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतात. काही लोक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून धोका पत करतात, तर काही लोक म्युचल फंड मध्ये पैसे गुंतवतात तर काही लोकांना प्रॉपर्टीतील गुंतवणूक आवडते. मात्र आजही असे अनेक लोक आहेत ज्यांचा पोस्ट ऑफिस सारख्या सुरक्षित आणि हमखास लाभ मिळवून देणाऱ्या योजनेवर विश्वास आहे.

सर्वसामान्य लोकांना एकच गोष्टी हवे असते ती म्हणजे आपली गुंतवलेली रक्कम सुरक्षित रहावी आणि खात्रीशीर परतावा मिळावा. यामध्ये नफा थोडा कमी मिळाला तरी चालेल पण पैसे बुडाले नाही पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असते. अशा लोकांसाठी पोस्ट ऑफिसच्या योजना खूप फायद्याच्या ठरत आहेत. तुम्हाला देखील तुमचा घर खर्च भागवण्यासाठी दर महिन्याला निश्चित परतावा हवा असेल, तर पोस्ट ऑफिसच्या मंथली इनकम स्कीम मध्ये गुंतवणूक करा आणि दर महिन्याला ठराविक रक्कम मिळवा.

काय आहे पोस्ट ऑफिस ची मंथली इनकम स्कीम?

पोस्ट ऑफिस मध्ये अतिशय खास योजना राबवली जाते ती म्हणजे मंथली इनकम स्कीम. या योजनेमध्ये तुम्ही एकदाच रक्कम गुंतवून यावरती दर महिन्याला ठराविक व्याज मिळू शकता. या योजनेतून मिळणाऱ्या दर महिन्यातील रकमेतून तुम्ही तुमचा घर खर्च भागवू शकता. या योजनेची मुदत पाच वर्षाची आहे म्हणजे पाच वर्ष तुम्हाला नियमितपणे मासिक व्याज मिळत राहील आणि कालावधी संपल्यानंतर मूळ रक्कम परत मिळेल.

हे पण वाचा| रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी! 1,700 पदांसाठी मेगा भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा? जाणून घ्या सविस्तर

गुंतवणूक किती करता येते?

  • सिंगल अकाउंट असेल तर तुम्ही जास्तीत जास्त नऊ लाख रुपयाचे गुंतवणूक करू शकता.
  • जॉईन अकाउंट असेल तर यामध्ये तीन जण एकत्रित अकाउंट ओपन करून 15 लाख रुपये पर्यंत गुंतवणूक करू शकतात.
  • पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये कमीत कमी गुंतवणूक फक्त एक हजार रुपयांपासून सुरू करता येते.

व्याजदर किती मिळतो?

सध्या पोस्ट ऑफिसच्या मंथली इनकम स्कीम मध्ये 7.4% वार्षिक व्याजदर दिला जात आहे. आणि हे व्याजाचे पैसे दरमहा थेट तुमच्या बँक खात्यात जमा केले जातात. Post Office Monthly Income Scheme

दर महिन्याला किती व्याज मिळेल?

समजा एखाद्या व्यक्तीच्या नावाने खाते खोलून तुम्ही नऊ लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर त्याला दरमहा अंदाजे 5,500 रुपयांचे व्याज मिळेल. जर तुम्ही जॉईंट अकाउंट खोलून पंधरा लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला दर महिन्याला जवळपास 9250 रुपये निव्वळ व्याजातून लाभ मिळेल. म्हणजे तुम्हाला कोणताही कामधंदा न करता यामध्ये फक्त पैसे गुंतवून पगारासारखे उत्पन्न मिळवता येते.

सर्वसामान्यांसाठी ही योजना फायद्याची

  • या योजनेत पैसे गुंतवणे म्हणजे यामध्ये कोणतेही जोखीम नाही कारण याला सरकारची हमी आहे त्यामुळे यामधील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असते.
  • दर महिन्याला निश्चित परतावा, बाजारातील चढउतारीमुळे मिळणाऱ्या लाभात कोणताही परिणाम होणार नाही.
  • दर महिन्याला पैसे हातात येत असल्यामुळे तुम्ही तुमचा घर खर्च, औषधोपचार सहजपणे भागवू शकता.
  • योजना निवृत्त लोकांसाठी ग्रहणींसाठी किंवा सुरक्षिततेला प्राधान्य देणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी खूप फायद्याची ठरत आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “पोस्ट ऑफिसची खास योजना! फक्त एवढे पैसे गुंतवा आणि दरमहा मिळवा 5,500 रुपयाचा लाभ”

Leave a Comment

error: Content is protected !!