Post office RD Scheme : सध्या भविष्यामध्ये पैसा कमवायचा विचार केला तर सर्वात पहिले एक विचार येतो यार आपण कुठेतरी गुंतवणूक केली पाहिजे. मंग गुंतवणुकीसाठी आपण काही मार्ग शोधतो. यामध्ये Mutual Fund, Stock market, किंवा इतर काही योजनांमध्ये किंवा पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्याचे विचार करतो. पण कधीही आपल्या मनामध्ये असा विचार येत नाही की आपण सेफ गुंतवणूक करावी जिथे आपल्याला भरघोस परतावा मिळेल. परंतु डबल मनामध्ये येईल अरे यार अशी कोणती योजना आहे का यामध्ये आपण गुंतवणूक करून खरंच आपल्याला डबल पैसा कमवता येईल. तर याचे उत्तर आहे हो मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी अशीच एक माहिती घेऊन आलो आहोत जिथे तुम्ही गुंतवणूक करून तुम्ही विचारी करू शकणार नाही इतकी रक्कम कमवणार आहात. आम्ही बोलत आहोत पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेबद्दल चला तर जाणून घ्यावा सविस्तर माहिती. Post office RD Scheme
महाराष्ट्र बातमी या पोर्टल सोबत जोडण्यासाठी इथे क्लिक करा
सध्या पोस्ट ऑफिस अंतर्गत अनेक अशा योजना राबवल्या जात आहे ज्या नागरिकांचे मन जिंकत आहेत. परंतु आपल्याला या योजनेची माहिती नसल्यामुळे गुंतवणूक करता येत नाही. आपण मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या इतर मार्गांचा वापर करतो. कधी कधी आपल्याला तोटा देखील सहन करावा लागतो. प्रॉफिट होतं जोखीम पण घ्यावी लागते. परंतु पोस्ट ऑफिस मध्ये केवळ शंभर रुपयांपासून सुरुवात करून तुम्ही लाखो रुपयांचा परतावा मिळू शकता. तेही सुरक्षित, तीर आणि सरकारच्या हमीसह!
पोस्ट ऑफिस आरडी योजना म्हणजे काय?
पोस्ट ऑफिस अंतर्गत अनेक भन्नाट योजना राबवलेल्या जातात. त्यामध्ये पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजना महिन्याला ठराविक रक्कम गुंतवणूक करून व पाच वर्षाच्या कालावधीत अधिक व्याजासह मोठी बचत तयार करण्याचा एक सोपा आणि खात्रीशीर मार्ग. विशेष बाब म्हणजे, ही योजना फक्त प्रौढांसाठीच नव्हे तर दहा वर्षाच्या वयाच्या मुलांच्या नावाने देखील सुरू करता येते, पालकांच्या मदतीने. वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर संबंधित मुलाने केवायसी आणि नवीन फॉर्म भरून खाते स्वतःच्या नावावरती चालावा लागते.
हे पण वाचा | पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना नागरिकांना मिळणार 2 लाख रुपये? पण ते कसे जाणून घ्या
फक्त शंभर रुपयांपासून होणार लाखोंचा परतावा
ही योजना कमीत कमी 100 रुपये मासिक भरणे पासून सुरू करता येते, मात्र अधिक गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा नाही. म्हणजे कोणीही दरमहा 100, पाचशे रुपये, 1000, किंवा पन्नास हजार रुपये देखील भरण्याचा निर्णय घेऊ शकता. सध्या या योजनेवरती 6.7% व्याजदर दिला जात आहे. जो सध्या कोणत्याही खाजगी बँकेच्या FD पेक्षा जास्त आहे आणि सुरक्षिततेच्या बाबतीत तर पोस्ट ऑफिस पेक्षा खात्रीशीर संस्था सध्या उपलब्ध नाही.
काय आहे नियम? पैसे कधी भरायचे?
तुम्ही जर महिना सुरू होताना, म्हणजे एक ते पंधरा तारखेच्या दरम्यान खाते सुरू केले असेल, तर प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत तुमचा आता भरावा लागतो. पण जर तुम्ही 16 तारखेच्या नंतर खाते सुरू केले असेल, तर त्या महिन्याच्या शेवटच्या कार्य दिवसापर्यंत हप्ता भरता येतो. ही व्यवस्था त्यामुळे वापरकर्त्यांची सोयीची आहे, विशेषता नोकरदार किंवा व्यवसाय करणाऱ्या वर्गांसाठी एक उत्तम संधी.
पाच वर्षाची मुदत, वाढवता येणारी सुविधा
पोस्ट ऑफिस RD योजना पाच वर्षाची असते, पण हवी असल्यास त्याला पुढील पाच वर्षासाठी वाढवता देखील येते. जर कधी गरज भासली तर तीन वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्ही खाते बंद करू शकता. तसेच अक्षमात मृत्यू झाल्यास नॉमिनी खाते चालू ठेवू शकता किंवा रक्कम काढू शकता.
TAX संदर्भातील नियम काय आहेत?
जर तुम्ही आरडी योजनेमध्ये गुंतवणूक करत असाल, तर 80c अंतर्गत तुम्हाला 1.5 लाख रुपये पर्यंतच्या गुंतवणुकीवर टॅक्स सूट मिळते. मात्र वार्षिक दहा हजार रुपयांपेक्षा अधिक व्याज मिळत असल्यास, त्यावरती TDS (Tax Deducted at Sources) लागू होतो पॅन कार्ड दिल्यास 10% आणि न दिल्यास 20% कर आकारला जातो.
बरं पाच वर्षात 35 लाखांचे उत्पन्न कसे होणार?
जर तुम्ही देखील दर महा 50 हजार रुपये या योजनेमध्ये गुंतवले, तर पाच वर्षात एकूण 30 लाख रुपये जमा होतात. रकमेवर तुम्हाला 6.7% वार्षिक चक्रवाढ व्याजदर आणि अंदाजे 5,68,291 रुपये अतिरिक्त मिळतात. म्हणजे तुम्हाला एकूण परतावा 35,68,291 रुपये मिळतो. हा परतावा कोणत्याही बाजारातील जोखमी शिवाय मिळतो, म्हणजे एकदम खात्रीशीर. जर तुम्ही देखील या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन चौकशी करा आणि तिथे असलेली आवश्यक माहिती भरा आणि गुंतवणूक सुरू करा.
(Disclaimer | वरील दिलेली माहिती फक्त एक माहिती करता दिलेले आहे आम्ही कुठलाही आर्थिक गुंतवणुकीबाबत सल्ला देत नाही.)
हे पण वाचा | पैसे दुप्पट करणारी पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! जाणून घ्या योजनेबद्दल सविस्तर माहिती