पोस्ट ऑफिसच्या या खास योजनेमध्ये फक्त 5 वर्षात कमवता येणार ₹7 लाख, कसं काय ते जाणून घ्या सविस्तर?


Post Office RD Scheme: महागाईच्या काळात सुरक्षित आणि चांगला परताव देणारी गुंतवणूक प्रत्येक जण शोधत असतात. बँकेतील गुंतवणुकीवर फारसा चांगला परतावा मिळत नसल्यामुळे अनेक जण इतर पर्यायाच्या शोधात असतात. अशावेळी पोस्ट ऑफिस मधील योजना तुमच्यासाठी चांगला पर्याय म्हणून पुढे येतात. पोस्ट ऑफिस मधील गुंतवणुकीला नेहमीच सुरक्षित मानली जाते. कारण पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये तुमचे पैसे बुडण्याची शक्यता नसते. या सर्व योजनांना सरकारी हमी मिळत असल्यामुळे तुमचे पैसे 100% सुरक्षित असतात.

पोस्ट ऑफिस मध्ये अनेक आकर्षक गुंतवणुकीसाठी योजना उपलब्ध आहेत. ज्यापैकी रिकरिंग डिपॉझिट (RD) योजना खूपच लोकप्रिय आहे. या योजनेत नियमितपणे थोडी थोडी रक्कम गुंतावी लागते आणि तुमच्या भविष्यात एक मोठा भांडवल उभा होते. यामुळे तुम्ही तुमच्या मुलाचे शिक्षण, लग्न, निवृत्तीनंतरचा खर्च किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीतील खर्च भागवू शकता. विशेषता नोकरदार छोटे व्यावसायिक आणि रोजंदारीने काम करणाऱ्या लोकांसाठी ही योजना खूप फायद्याची आहे.

पोस्ट ऑफिस आरडी योजना (Post Office RD Yojana)

पोस्ट ऑफिस आरडी योजना ही एक प्रकारची बचत योजना आहे. या योजनेमध्ये तुम्हाला दर महिन्याला एक निश्चित रक्कम गुंतवी लागते. यावर तुम्हाला चक्रवाढ पद्धतीने व्याज दिले जाते. ज्यामुळे तुमची गुंतवणूक वेगाने वाढून मोठे भांडवल तयार होते. योजनेची मुदत पूर्ण झाल्यावर तुम्हाला व्याजासहित एकूण रक्कम दिली जाते. ही योजना भारत सरकारच्या अखत्यारित असल्यामुळे यामध्ये जोखीम नाही त्यामुळे तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित मानली जाते. Post Office RD Scheme

हे पण वाचा| घरबसल्या बनवा तुमचे मतदार कार्ड; जाणून घ्या सर्व प्रोसेस..

पोस्ट ऑफिस आरडी योजनेमध्ये तुम्ही जर पाच वर्षासाठी दर महिन्याला दहा हजार रुपये याप्रमाणे गुंतवणूक केली तर तुमची एकूण रक्कम सहा लाख रुपये होईल. सध्याच्या व्याजदरानुसार मॅच्युरिटी नंतर तुम्हाला एकूण 7 लाख 13 हजार 659 रुपये मिळतील. म्हणजेच तुम्हाला एक लाख 13 हजार 659 रुपये इतका नफा मिळाला आहे. या योजनेत दर तीन महिन्यांनी व्याजदर चक्रवाढ पद्धतीने वाढतो. तुम्ही देखील भविष्यासाठी गुंतवणूक करून काही पैशाची बचत करू इच्छित असाल तर या योजनेमध्ये गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते.

पोस्ट ऑफिस योजनेचा व्याजदर आणि इतर फायदे

जुलै ते सप्टेंबर 2025 या तीन महिन्यासाठी पोस्ट ऑफिस आरडी योजनेत 6.70% व्याजदर दिला आहे. हा व्याजदर सरकारकडून दर तीन महिन्यांनी बदलला जाऊ शकतो. ही योजना पाच वर्षासाठी असते परंतु तुम्ही तुमच्या गरजेनुसार ती पुढे देखील चालू ठेवू शकता. या योजनेचा आणखीन एक महत्त्वाचा फायदा म्हणजे जर तुम्ही एका वर्षात 12 हप्ते पूर्ण केले असतील तर तुम्हाला जमा केलेल्या रकमेच्या जवळपास 50% कर्ज मिळू शकते. जर तुम्हाला आपातकालीन परिस्थितीमध्ये पैशाची गरज भासल्यास तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. मात्र या कर्जावरील व्याजदर हा आरडीच्या व्याजदरापेक्षा दोन टक्के अधिक असतो.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “पोस्ट ऑफिसच्या या खास योजनेमध्ये फक्त 5 वर्षात कमवता येणार ₹7 लाख, कसं काय ते जाणून घ्या सविस्तर?”

Leave a Comment

error: Content is protected !!