Post Office RD Yojana: आजकाल प्रत्येक जण सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असतात. यामध्ये पूर्णपणे सुरक्षित आणि आकर्षक परतावा देणारी पोस्ट ऑफिस ची आरडी योजना जबरदस्त नफा मिळवून देत आहे. या स्कीम मध्ये तुम्ही दर महिन्याला फक्त शंभर रुपयापासून गुंतवणूक सुरू करू शकता. आणि आकर्षक 6.7% व्याजदर मिळवू शकता. जाणून घ्या पाच वर्षात किती रक्कम तयार होईल आणि कर्जाची सोय कशी असेल.
भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये पाच वर्ष म्हणजेच सात महिन्याची आरडी योजना उपलब्ध आहे. या योजनेमध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करून सुरक्षित पद्धतीने जबरदस्त नफा मिळवू शकतात. या योजनेमध्ये किमान शंभर रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते आणि दहाच्या मल्टिपल मध्ये रक्कम वाढवता येते. गुंतवणुकीसाठी जास्तीत जास्त तुम्ही कितीही रक्कम गुंतवू शकता यासाठी कोणतीही मर्यादा नाही.
आकर्षक परतावा
पोस्ट ऑफिस आरडी योजनेमध्ये भारत सरकारच्या सेविंग स्कीमचा भाग असल्याने तुमची रक्कम पूर्णपणे सुरक्षित राहते. यासोबत कोणताही स्कॅम होणार नाही याची 100% गॅरंटी आहे. या योजनेमध्ये ठराविक कालावधीनंतर खात्रीशीर व्याज मिळते. दर महिन्याला छोटी छोटी बचत करून दीर्घ काळानंतर एक मोठा फंड तयार करण्याची ही एक उत्तम संधी निर्माण झाली आहे. Post Office RD Yojana
हे पण वाचा| गुंतवणूकदारांसाठी खास ऑफर! 444 दिवसांची विशेष FD बनवणार मालामाल! कोणत्या बँका देतात सर्वाधिक रिटर्न?
सध्या पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेअंतर्गत पाच वर्षाच्या ठेवीवर वार्षिक 6.7 टक्के व्याजदर दिला जातो. खाते पाच वर्षांनी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही आणखीन अर्ज करून पुढे पाच वर्षासाठी वाढवू शकता. त्यामुळे सातत्याने बचत करण्याची आणि अधिक रक्कम जमा करण्याची ही सुवर्णसंधी मिळते. जर तुम्ही या योजनेमध्ये दर महिन्याला सहा हजार रुपये गुंतवले तर 60 महिन्यानंतर तुम्हाला एकूण चार लाख 28 हजार रुपये मिळतील. यात तुमची मूळ गुंतवणूक तीन लाख 60 हजार रुपये असेल आणि निव्वळ व्याजातून मिळालेला नफा 68 हजार 197 रुपये असेल.
लोन ची सुविधा
जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक सुरू केली आणि किमान एक वर्ष पूर्ण झाले तर नियमानुसार खातेदाराला आपल्या जमा रकमेच्या 50% पर्यंत कर्ज घेता येते. हे कर्ज तुम्ही एक सोबत किंवा मासिक हप्त्यामध्ये परतफेड करू शकता. ही सुविधा आपातकालीन गरजेच्या वेळी तुम्ही वापरू शकता. तुम्ही देखील पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुमचे पैसे गुंतू इच्छित असाल तर लगेच जवळील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तुमचे खाते उघडून घ्या आणि दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवून चांगला नफा मिळवा.