Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! इतक्या रुपयांची फक्त एकदाच गुंतवणूक करा अन् दर महिन्याला मिळवा ₹20,000


Post Office Scheme: पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी अनेक वेगवेगळ्या लाभदायी योजना राबवत आहे. प्रत्येकजणाला भविष्यासाठी गुंतवणूक करणे खूप महत्त्वाचे ठरते. सेवानिवृत्त झाल्यानंतर आपले आर्थिक आयुष्य सुखकर असावे असे प्रत्येकालाच वाटते. यासाठी अनेक जण नोकरी करत असतानाही अनेक योजनेमध्ये गुंतवणूक करत असतात. अशाच एका उत्तम योजनेबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. ही योजना खास ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. पोस्ट ऑफिस ची ज्येष्ठ नागरिक बचत योजना तुम्हाला एकदाच केलेल्या गुंतवणुकीवर दर महिन्याला वीस हजार रुपये मिळण्याची संधी देते. Post Office Scheme

पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना या नावावरूनच ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार केलेली आहे असे समजते. जिथे त्यांना गुंतवणुकीवर चांगला व्याज दर मिळतो. या योजनेचा मुख्य उद्देश हा आहे की, निवृत्तीनंतर नियमित उत्पादनाची सोय व्हावी आणि आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये. सध्या पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये 8.2% व्याजदर दिला जातो. हा व्याजदर इतर अनेक बचत योजनेपेक्षा खूप जास्त आहे. ज्यामुळे तुम्हाला चांगला परतावा मिळतो. त्याचबरोबर योजनेत गुंतवलेल्या रकमेवर आयकर कलम 80 अंतर्गत एक पॉईंट पाच लाख रुपयापर्यंत कर सवलत मिळते.

हे पण वाचा| घरबसल्या मिळवा दरमहा 7,000 रुपये! महिलांसाठी LIC ची भन्नाट योजना, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

दरमहा वीस हजार रुपये कसे मिळवावे?

तुम्हाला जर पोस्ट ऑफिसच्या या योजनेअंतर्गत दर महिन्याला वीस हजार रुपये मिळवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला या योजनेत एकदाच तीस लाख रुपयाचे गुंतवणूक करावी लागेल. सध्याच्या 8.2% व्याजदरानुसार तुम्हाला वार्षिक 2 लाख 46 हजार रुपये व्याजातून मिळतील. म्हणजेच तुम्हाला दर महिन्याला घरबसल्या वीस हजार पाचशे रुपये निव्वळ नफा मिळेल. या योजनेत तुम्ही किमान 1000 रुपयापासून गुंतवणूक केला सुरुवात करू शकतात तर जास्तीत जास्त 30 लाख रुपयापर्यंत रक्कम गुंतवू शकतात. जर तुम्ही तीस लाख रुपयाचे गुंतवणूक केली तर तुम्हाला दरमहा वीस हजार रुपये मिळू शकतात.

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये:

  • साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे नागरिक यामध्ये खाते उघडू शकतात.
  • तुम्ही सिंगल किंवा संयुक्त खाते उघडू शकता.
  • या योजनेची मॅच्युरिटी पाच वर्षानंतर आहे.
  • पोस्ट ऑफिस योजनेमध्ये केलेले गुंतवणूक अत्यंत सुरक्षित मानली जाते कारण ती भारत सरकारद्वारे राबवली जात आहे.

Disclaimer: कोणत्याही योजनेचा व्याजदर सरकारद्वारे वेळोवेळी बदलला जाऊ शकतो. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी सध्या किती टक्के व्याजदर मिळतो हे पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तपासणे गरजेचे आहे. आम्ही फक्त वाचकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये कोणतीही आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! इतक्या रुपयांची फक्त एकदाच गुंतवणूक करा अन् दर महिन्याला मिळवा ₹20,000”

Leave a Comment

error: Content is protected !!