Post Office Scheme | सध्या पोस्ट ऑफिस अंतर्गत सर्वसामान्यांसाठी अनेक भन्नाट योजना राबवल्या जातात. त्या योजना ग्राहकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करत आहे. तुम्ही देखील गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल आणि चांगली रक्कम कमवण्याचा विचार करत असाल तर ही भन्नाट योजना तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे. पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम अशी योजना आहे, एकदा सुरू केली की दर महिन्याला ठरलेले पैसे खात्यात जमा होतात. आणि हो यात जोखीम शून्य म्हणजे बँक बुडाली, शेअर मार्केट घसरल कोणतेही धोके नाहीत, त्यामुळे योजना एक सर्वोत्तम योजना आहे. Post Office Scheme
या योजनेच खास वैशिष्ट्ये
एकदाच पैसे गुंतवा, दर महिन्याला मिळवा ठराविक उत्पन्न. सरकार हमी असल्याने पूर्ण सुरक्षा, मासिक उत्पन्नाची गरज आहे अशा निवृत्त, ग्रहणी, शेतकरी आणि छोटा व्यवसाय करणारे यांच्यासाठी ही योजना खरच महत्त्वाची आहे.
किती पैसे मिळत आहेत?
या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सिंगल खाते असणारे व्यक्ती जास्तीत जास्त नऊ लाख रुपये गुंतवू शकतात. तसेच जॉईन खाते असेल तर 15 लाख रुपये पर्यंत गुंतवणूक करता येते. जर तुम्ही पती-पत्नीने मिळून जॉईन खाते उघडलं तर दहा लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला व्याजदर 7.4% मिळणार आहे आणि महिन्याला रक्कम ₹6,167 रुपये असणार आहे आणि वर्षभरात एकूण ७४ हजार रुपये थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत.
यासाठी काय आवश्यक कागदपत्रे आहेत जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते पासबुक आणि पोस्टाची खात्याची माहिती, खाते उघडण्यासाठी किमान 1000 रुपये भरणे आवश्यक आहे.
आजच्या या काळात स्थिर आणि खात्रीशीर उत्पन्न मिळवून देण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या योजना सक्षम आहेत. गुंतवणूक करताना पोस्ट ऑफिसच्या योजना निवडा असा आमचं म्हणणं आहे.
(Disclaimer: गुंतवणूक करताना स्वतःच्या जोखमीवर गुंतवणूक करा ही माहिती केवळ माहिती करता आहे आम्ही कुठलीही आर्थिक गुंतवणूक करण्याबाबत सल्ला देत नाहीत. आणि आर्थिक नुकसानीबाबत आम्ही जबाबदार राहणार नाही)