Post Office Scheme : जर तुम्ही देखील गुंतवणूक करण्याचा विचार करताय आणि चांगली योजना शोधत असाल तर पोस्ट ऑफिस (Post Office Scheme) तुमच्यासाठी अशीच योजना घेऊन आलेली आहे. जिथे तुम्ही गुंतवणूक करून चांगली रक्कम बनवू शकणार आहात. परंतु यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी काय महत्त्वाचा आहे व आपल्याला कसा चांगला परतावा मिळणार आहे यासाठी हा लेख सविस्तर वाचा. Post Office Scheme
घरातील आर्थिक स्थिरतेसाठी आणि कर बचतीसाठी आजकाल लोक गुंतवणूक पत्नीच्या नावे करत आहेत. मालमत्ता खरेदी पासून बचत योजनांपर्यंत, पत्नीच्या नावावर केलेली गुंतवणूक केवळ सुरक्षेतेचा आधार देत नाही, तर भविष्यातील गरजांसाठी ही उत्तम तयारी ठरते. या पार्श्वभूमी वरती पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजना म्हणजे FD सारखीच पण अधिक फायद्याची योजना चर्चेत आहे.
पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजना म्हणजे काय?
ही योजना अनेक लोकांचे मन जिंकत आहे अगदी बँक सारख्या एफडी सारखी योजना आहे तुम्ही एक रकमी रक्कम निश्चित कालावधीसाठी ठेवता आणि मुदत पूर्ण झाल्यावर मूळ रकमेसोबत ठरलेले व्याज मिळते. पोस्ट ऑफिस मध्ये १,२,३ आणि पाच वर्षाच्या कालावधीसाठी एफडी खाते उघडता येते.
सध्याचे व्याजदर
जर एक वर्षासाठी एफडी केली तर 6.9% आणि दोन वर्षासाठी व्याज Fd केली तर सात टक्के आणि तीन वर्षासाठी केली 7.1% व्याजदर मिळतो आणि पाच वर्षासाठी केल्यात 7.5% व्याजदर मिळतं. हे दर सध्या अनेक बँकांच्या एफडी पेक्षा अधिक आहेत, त्यामुळे ही सुरक्षित आणि स्थिर उत्पन्न देणारी योजना ठरते.
समजा तुम्ही पत्नीच्या नावावरती पोस्ट ऑफिस मध्ये एक लाख रुपये गुंतवले दोन वर्षासाठी तर व्याजदर 7% मिळणार आणि 24 महिन्यानंतर एकूण परतावा एक लाख 7185 म्हणजे फक्त दोन वर्षात ₹7,185 अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे.
पत्नीच्या नावावर गुंतवणूक केल्याने भविष्यातील आर्थिक गरजांसाठी सुरक्षित निधी तयार होतो. त्यासोबत कर बचतीसाठी उपयोगी ठरते. पोस्ट ऑफिस एफडी पूर्ण सरकारी हमे असलेली योजना आहे. मतदाराला इतर शासकीय योजना आणि लाभांसाठी पात्र मिळू शकते.
हे पण वाचा | पैसे दुप्पट करणारी पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! जाणून घ्या योजनेबद्दल सविस्तर माहिती