पती-पत्नीला पोस्ट ऑफिसच्या या योजनेतून मिळणार दर महिन्याला 10 हजार रुपये, पण ते कसे जाणून घ्या


Post Office Scheme : पोस्ट ऑफिस अंतर्गत अनेक अशा भन्नाट योजना राबवल्या जातात त्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून चांगला नाफा मिळू शकतात. परंतु आपल्याला त्या योजनेची माहिती नसते जिथे गुंतवणूक करून आपल्याला चांगला नफा मिळू शकतो यामुळे आपण मागे राहतो अनेक असे लोक आहेत या योजनेचा लाभ घेतला आहे यामुळे ते आयुष्यामध्ये एक मोठी रक्कम तयार करण्यास सक्सेस ठरले आहेत. तुम्हाला देखील अशा काही योजनेमध्ये गुंतवणूक करायचे आहे तर ही बातमी नक्की वाचा. Post Office Scheme

लग्न झाले की संसराची जबाबदारी सुरू होते. मंगल खर्च, बचत, भावी गुंतवणूक आणि रोजच्या गरजा यासाठी नियमित पैसा लागतो. पण जर लग्नानंतर एखादी अशी योजना मिळाली, जिच्यात एकदा पैसे टाका आणि दर महिन्याला निश्चित उत्पन्न मिळत राहिलं, तर? होय पोस्ट ऑफिस ची एक योजना आहे, जी खास अशा जोडप्यांसाठी आहे, ज्यांना सुरक्षित, निश्चित आणि दरमहा येणार उत्पन्न हवं. या योजनेत तुम्ही फक्त एकदाच गुंतवणूक करा, आणि त्यातून दर महिन्याला थेट बँकेत दहा हजार रुपये पैसे मिळवा तेही वर्षाच्या 5 कालावधीत

ही योजना म्हणजे पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (Post Office Monthly Income Scheme) सरकारी खात्रीशीर योजना. एकदा पैसे जमा केले की पुढचे 60 महिने म्हणजे पाच वर्षे तुम्हाला महिन्याला ठराविक रक्कम मिळणार.

ही योजना म्हणजे कशी चालते?

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS) मध्ये सरकारने सध्या 7.4% वार्षिक व्याजदर निश्चित केला आहे. हे व्याज तुम्हाला प्रत्येक महिन्यात मिळतं. म्हणजे जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता, तेव्हा त्यावर व्याजदर महिन्याला तुमच्या खात्यात जमा होतं. खास गोष्ट म्हणजे ही योजना अगदी घरातल्या ग्रहणी पासून ते रिटायर्ड व्यक्तींना देखील फायदेशीर ठरते.

जोडीदारासोबत खाते उडाल तर खास फायदा

जर तुम्ही एखादं खोटं उघडत असाल, तर त्यात जास्तीत जास्त नऊ लाख रुपये गुंतवता येतात. पण जर तुमचं संयुक्त खात असेल म्हणजे नवरा बायकोचे मिळून तर एकाच खातात 15 लाख रुपये पर्यंत गुंतवणूक करता येते. त्यावरून दर महिन्याला तुम्हाला जवळपास 9250 रुपये नियमितपणे मिळतात. म्हणजे लग्न झाल्यावर ती संसाराचे पैसे येण्याचा एकमेव मजबूत कायमस्वरूपी मार्ग तयार होतो.

तुमचे उत्पन्न किती होईल खालील गणित समजून घ्या

  • संयुक्त खाते (पंधरा लाख रुपये पर्यंत गुंतवणूक)
  • वार्षिक व्याज : ₹1,11,000
  • मासिक रक्कम : ₹9,250
  • एकल खाते ( ९ लाख गुंतवणूक):
  • वार्षिक व्याज : 66,600
  • मासिक रक्कम : ₹5,550

योजनेची खास वैशिष्ट्ये :

  • किमान ₹1,000 पासून खाते सुरू करता येते.
  • मुदत पाच वर्षाची असते.
  • व्याज दर महिना मिळतो आणि तो तुमच्या पोस्ट ऑफिस खात्यामध्ये जमा होतो.
  • पाच वर्षानंतर तुम्ही हेच खाते नव्या व्याज दरात पुन्हा सुरू करू शकता.
  • तुम्ही मासिक व्याज न काढल्यास तेही वाढत राहता आणि मुदतीपूर्वी नंतर मूळ रकमेस मोठी रक्कम तयार होते.

कोण उघडू शकतो हे खाते?

  • कुठलाही प्रौढ व्यक्ती स्वतःच्या नावाने खाते उघडू शकतो.
  • नवरा बायको मिळून संयुक्त खाते उघडू शकतात.
  • आई-वडील आपल्या मुलांचे नावे खाते उघडू शकतात.
  • आई वडील आपल्याला मुलांचे नावे खाते उघडू शकतात.
  • आणि मुलगा 10 वर्षाचा असेल तर त्याच्या नावानेही वैयक्तिक खाते उघडता येते.

ही योजना कोणासाठी योग्य आहे?

ज्यांना दरमहा फिक्स पैसे हवेत, ज्यांना सुरक्षित आणि निश्चित उत्पन्न हवं, अशा गृहिणी निवृत्त लोक, नवीन लग्न झालेले जोडप, किंवा कोणतेही त्यांच्यासाठी ही योजना एकदम परफेक्ट आहे. सरकारी योजना असल्यामुळे कोणतेही रिस्क नाही आणि पैसे देखील पूर्ण खात्रीने परत मिळतात. घरात महिन्याचा खर्च चालवण्यासाठी, किंवा शाळा फी, विज बिल यासाठी उपयोगी ठरते.

तुम्ही देखील या योजनेमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर लवकरात लवकर आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये एकदा भेट द्या. आधार कार्ड पॅन कार्ड आणि फोटो घेऊन जा फॉर्म भरा आणि सुरुवात करा तुमच्या मासिक कमाईच्या प्रवासाला.

(Disclaimer: वरील दिलेली माहिती ही आम्ही, पोस्ट ऑफिसच्या योजनेच्या आधारे दिलेली आहे याबाबत आम्ही कुठलाही दवा करत नाही जर तुम्हाला या योजनेमध्ये गुंतवणूक करायचे असल्यास तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन चौकशी करू शकता.)

हे पण वाचा | पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये मिळत आहे महिन्याला ₹3000 रुपये पण ते कसे पहा

Leave a Comment

error: Content is protected !!