रोज फक्त 50 रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल 35 लाख रुपये; काय आहे योजना? जाणून घ्या सविस्तर माहिती


Post Office Scheme: आज-काल महागाईच्या काळात प्रत्येकाला भविष्यासाठी थोडीफार बचत करून ठेवावी असे वाटते. पण प्रश्न निर्माण होतो कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांनी मोठा पण नेमका कसा तयार करायचा? शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला सर्व माहिती असणे आवश्यक आहे त्याचबरोबर यामध्ये जोखीम देखील मोठ्या प्रमाणात असते. मात्र ज्यांना बिना जोखीम गुंतवणूक करायचे आहे त्यांच्यासाठी पोस्ट ऑफिस ची ग्रामसुरक्षा योजना एक उत्तम पर्याय ठरत आहे. या योजनेतील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे. या योजनेत रोज फक्त पन्नास रुपये म्हणजे महिन्याला सुमारे 1500 रुपये गुंतवले तर पुढे जाऊन तब्बल 35 लाख रुपयांचा फंड तयार होत आहे.

काय आहे ग्राम सुरक्षा योजना?

भारतीय पोस्ट विभागाच्या Ruler Postal Life Insurance (RPLI) अंतर्गत ही योजना चालवली जाते. ग्रामीण आणि निमशहरी भागातील नागरिकांना लक्षात घेऊन ही योजना सुरू करण्यात आली आहे. यातून अगदी सामान्य माणूस शेतकरी कामगार किंवा छोट्या नोकरीतील व्यक्ती देखील दीर्घकाळात मोठा फंड तयार करू शकतो. या योजनेअंतर्गत किमान विमा रक्कम 10000 पासून ते दहा लाखापर्यंत घेता येते. 19 वर्षापासून 55 वर्षापर्यंत कुणीही या योजनेत सहभागी होऊ शकतात. ही योजना जास्तीत जास्त 80 वर्षापर्यंत चालू शकते. Post Office Scheme

हे पण वाचा| महत्त्वाची बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

प्रीमियम भरण्याची पर्याय

या योजनेत प्रीमियम भरण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मासिक त्रेमासिक, सहामाही किंवा वार्षिक म्हणजेच आपल्याला जशी सोय होईल तसं आपण हातभार लावू शकतो. तसेच पॉलिसी सुरू झाल्यानंतर चार वर्षानंतर कर्ज घेण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे. तीन वर्षानंतर पॉलिसी सरेंडर करता येते. मात्र पाच वर्षांपूर्वी पॉलिसी सोडल्यास बोनसचा लाभ मिळत नाही. ही योजना केवळ बचत योजना नसून विम्याचाही फायदा देते. जर गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास नोमिनी व्यक्तीला संपूर्ण विमा रक्कम आणि त्यावर मिळालेला बोनस दिला जातो. यामुळे कुटुंबाच्या भविष्यासाठी एक मजबूत आधार तयार होतो.

35 लाखाचा फंड कसा तयार होईल?

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल रोज फक्त पन्नास रुपये जमा करून 35 लाख रुपये कसे कमवायचे? जर एखादा तरुण 19 वर्षाचा असताना या योजनेत सहभागी झाला तर दरमहा पंधराशे रुपये म्हणजेच दररोज 50 रुपये प्रीमियम भरत राहिला, तर मुदतीच्या शेवटी त्याला सुमारे 31 लाख ते 35 लाख रुपये पर्यंत रक्कम परत मिळू शकते. याचा अर्थ असा की ही अंतिम रक्कम विम्याची रक्कम, वय, पॉलिसी चा कालावधी आणि बोनस दर यावर अवलंबून असते.

या योजनेत गुंतवणूक का करावी?

या योजनेत गुंतवणूक का करावी असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. आज आपण रोज सहजपणे पन्नास रुपये चहा, नाश्त्यावर किंवा छोट्या-मोठ्या गोष्टीवर खर्च करतो. पण हाच पैसा जर आपण व्यवस्थित योजनेबद्दल पद्धतीने एखाद्या योजनेत गुंतवला तर पुढील आयुष्यात तो मोठा आधार ठरू शकतो. ग्राम सुरक्षा योजना ही जोखमी मुक्त आहे, सुरक्षित आहे आणि सरकारी हमी असलेली योजना आहे. त्यामुळे यात केलेली गुंतवणूक कुठल्याही प्रकारे वाया जात नाही.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

2 thoughts on “रोज फक्त 50 रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल 35 लाख रुपये; काय आहे योजना? जाणून घ्या सविस्तर माहिती”

Leave a Comment

error: Content is protected !!