पोस्ट ऑफिसच्या या खास योजनेत एकदाच गुंतवणूक करा आणि मिळवा दरमहा ₹20,500; जाणून घ्या सविस्तर…


Post Office Scheme: निवृत्तीनंतर मासिक उत्पन्नाची चिंता अनेकांना पडत असते. सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणेच पेन्शनचा लाभ सर्वांनाच मिळत नाही. पण काळजी करू नका पोस्ट ऑफिस ची एक खास योजना तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये तुम्हाला निवृत्तीनंतरही नियमितपणे सुरक्षित मासिक उत्पन्न मिळवण्याची संधी मिळेल. ही योजना विशेष ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आली आहे. आजकाल बँकेच्या एफडी व्याज दारात घसरण झाली आहे. त्यामुळे गुंतवणुकीसाठी चांगले पर्याय शोधणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत पोस्ट ऑफिस ची ज्येष्ठ नागरिक बचत योजना एक उत्तम पर्याय ठरू शकते. या योजनेत केवळ एकदाच गुंतवणूक करून दरमहा चांगले व्याज मिळते.

पोस्ट ऑफिस योजनेचे फायदे

  • निवृत्तीनंतर प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होते ज्यामुळे तुमचा दैनंदिन खर्च आणि आर्थिक गरजा भागवणे सोपे होते.
  • सध्या या योजनेत 8.2% आकर्षक व्याजदर दिला जातो तो बऱ्याच बँकांच्या एफडी दरापेक्षा खूप जास्त आहे.
  • आयकर कलम 80सी अंतर्गत तुम्ही दीड लाख रुपयापर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलत मिळू शकतात.
  • पोस्ट ऑफिसच्या या योजनेला सरकारची हमी असल्यामुळे तुमच्या गुंतवणुकीची रक्कम 100% सुरक्षित असते.
  • या योजनेत तुम्ही केवळ एक हजार रुपयांपासून गुंतवणुकीला सुरुवात करू शकतात.

योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

  • पोस्ट ऑफिस ची ही योजना प्रामुख्याने साठ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही भारतीय ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध आहे. याशिवाय खालील व्यक्ती देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • ज्यांनी सरकारी नोकरीतून वी आर एस घेतला आहे असे 55 ते 60 वयोगटातील व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • संरक्षण दलातून निवृत्त झालेले 50 ते 60 वयोगटातील व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

हे पण वाचा| कांद्याचे दर वाढणार का घसरणार? कांदा साठवला तर सडतोय, विकला तर परवडत नाही!

20,500 रुपये मासिक उत्पन्न कसे मिळवावे?

या योजनेची मुदत पाच वर्षाचे आहे आणि यात जास्तीत जास्त 30 लाख रुपये पर्यंत गुंतवणूक करता येते. जर तुम्ही या योजनेत 30 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर 8.2% वार्षिक व्याजदराने तुम्हाला वर्षाला 2.46 लाख रुपये व्याज मिळेल. याचाच अर्थ दरमहा तुमच्या खात्यात 20500 रुपये जमा होतील. समजा निवृत्तीनंतर दरमहा एवढी रक्कम तुम्हाला मिळाली तर तुमच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी तुम्हाला किती मोठा दिलासा मिळू शकतो. Post Office Scheme

खाते कसे उघडावे?

तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये आपले SCSS खाते सहजपणे उघडू शकतात. मात्र काही महत्त्वाचे नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहेत.

  • जर तुम्हाला मुदतपूर्तीपूर्वी खाते बंद करायचे असेल तर काही महत्त्वाच्या अटी लागू होतात.
  • एका वर्षाच्या आत खाते बंद केल्यास कोणतेही व्याजदर मिळणार नाही.
  • एक ते दोन वर्षाच्या दरम्यान खाते बंद केल्यास एक पॉईंट पाच टक्के व्याजदर कमी केला जाईल.
  • दोन ते पाच वर्षाच्या दरम्यान खाते बंद केल्यास एक टक्का व्याजदर कमी केला जाईल.

या योजनेच्या व्याजाच्या रकमेवर टीडीएस लागतो, जर तुमचे वार्षिक व्याज 50000 रुपयापेक्षा जास्त असेल, मात्र जर तुम्ही फॉर्म 15g किंवा 15 एच भरला तर टीडीएस कापला जात नाही.

पोस्ट ऑफिस जेष्ठ नागरिक बचत योजना ही निवृत्तीनंतरच्या जीवनमानासाठी एक सुरक्षित आणि फायदेशीर आर्थिक आधार देणारी योजना आहे. जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी जेष्ठ नागरिक चांगल्या गुंतवणुकीच्या शोधात असाल तर त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. सुरक्षित गुंतवणूक आणि दरमहा फिक्स इन्कम मिळावी अशी इच्छा धरत असाल तर या योजनेचा नक्कीच विचार करा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “पोस्ट ऑफिसच्या या खास योजनेत एकदाच गुंतवणूक करा आणि मिळवा दरमहा ₹20,500; जाणून घ्या सविस्तर…”

Leave a Comment

error: Content is protected !!