Post Office Scheme: आपल्या आयुष्यात आपल्या अडचणी साठी सेव्हिंग ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. रोजचा खर्च भागून उरलेले पैसे जर आपण योग्य ठिकाणी गुंतवले तर भविष्यात ते आपल्यासाठी अडचणीच्या काळात मोठा आधार बनू शकतात. विशेष म्हणजे पैशावर हमखास व्याज मिळते आणि तुमची सर्व रक्कम पूर्णपणे सुरक्षित राहते. म्हणूनच बहुतांश लोक पोस्ट ऑफिसच्या FD किंवा RD योजनेमध्ये सुरक्षित पैसे गुंतवताना दिसत आहे.
अनेक बँकांच्या FD पेक्षा पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट FD योजनेमध्ये जास्त परतावा मिळतो. यामध्ये मिळणारा व्याजदर ठराविक असतो पण सरकारकडून या योजनेला सुरक्षेतेची पूर्ण हमी असते. त्यामुळे या योजनेत केलेले गुंतवणुकीला कोणताही धोका निर्माण होत नाही. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत जर तुम्ही तुमच्या बायकोचे नावाने खाते उघडले आणि गुंतवणूक केली तर तुमचा आणखीन फायदा होऊ शकतो.
हे पण वाचा| SBI मध्ये मेगा भरती! लगेच अर्ज करा, सरकारी नोकरी करण्याची हीच सुवर्ण संधी..
पत्नीच्या नावाने गुंतवणूक केल्यास काय फायदा मिळतो?
आपल्या घरात बहुतेक वेळा नवरा हा कुटुंबाचा प्रमुख असतो. पण आजकाल एक मोठा वर्ग पत्नी सुद्धा आर्थिक दृष्ट्या सक्षम होत चालली आहे. म्हणूनच जर तिच्या नावाने गुंतवणूक केली तर तुम्हाला एक मोठा फायदा मिळू शकतो. जर तुम्ही तुमच्या बायकोच्या नावाने FD केली तर तिच्या भविष्यासाठी सुरक्षित राहणार तर आहेत त्याचबरोबर कर सवलत देखील मिळते. त्यामुळे तुमच्या पत्नीच्या नावाने गुंतवणूक केल्यास तुम्हाला फायदा मिळू शकतो.
पोस्ट ऑफिस एफडी योजनेमध्ये किती व्याज मिळते?
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजनेमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कालावधीसाठी किती व्याजदर मिळते? चला तर याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. Post Office Scheme
- 1 वर्षासाठी: 6.9% व्याजदर
- 2 वर्षासाठी: 7.0% व्याजदर
- 3 वर्षासाठी: 7.1% व्याजदर
- 5 वर्षासाठी: 7.5% व्याजदर
आज कालच्या काळात शेअर मार्केट वर आणि म्युचल फंड वर विश्वास नसणाऱ्या लोकांसाठी ही योजना उपयोगी ठरेल. पोस्ट ऑफिसची ही FD योजना पूर्णपणे सुरक्षित आणि जास्त फायदा देणारे ठरत आहे. विशेष म्हणजे पत्नीच्या नावाने गुंतवणूक केल्यास घरातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आणि तुम्हाला सरकारकडून कर सवलत देखील मिळेल. जर तुमच्याकडे बचत केलेले थोडे पैसे जरी शिल्लक असतील तर लगेच पोस्ट ऑफिसच्या FD योजनेमध्ये त्याचे गुंतवणूक करा आणि तुमचे भविष्य सुरक्षित करा.
1 thought on “पोस्ट ऑफिस मध्ये बायकोच्या नावाने 1 लाखांची FD करा अन् मिळवा जबरदस्त नफा..”