Post Office Scheme: आपल्या भविष्यासाठी आपणच कुठेतरी गुंतवणूक करून चांगला नफा मिळवला पाहिजे. असं प्रत्येक जणाला वाटते. घरातील वडीलधारी व्यक्ती नेहमीच सांगत असतात, रोजच्या रोज खर्च होत असतो पण थोडे पैसे बाजूला ठेवून भविष्याचा खर्च कमी करता येतो. आणि वाढत्या महागाईमुळे आजच्या काळात ही गोष्ट अतिशय गरजेची बनली आहे. आज-काल मर्यादित पगार आणि खर्च अमर्यादित झाला आहे. अशावेळी पैशाची योग्य ठिकाणी बचत करून गुंतवणूक करणे खूप महत्त्वाचे ठरते. कारण भविष्यात तुम्हाला आपातकालीन परिस्थितीमध्ये कधीही पैशाची गरज भासू शकते.
याच पार्श्वभूमीवर पोस्ट ऑफिसच्या काही जबरदस्त योजना सर्वसामान्य लोकांना चांगला परतावा मिळवून देत आहेत. त्यातीलच एक म्हणजे पब्लिक प्रायव्हेट फंड (PPF) योजना होय. या योजनेमध्ये कमी जोखीम आणि आकर्षक व्याजदर आहे. त्याचबरोबर या योजनेला सरकारी हमी असल्यामुळे लोकांकडून उत्तम पसंती दर्शवली जात आहे. या योजनेत दरमहा गुंतवणूक करून तुम्ही मोठे भांडवल तयार करू शकता.
काय आहे PPF योजना?
- या योजनेअंतर्गत सध्या सरकारकडून 7.1% वार्षिक व्याजदर दिला जात आहे.
- या योजनेतील गुंतवणूक पूर्णपणे टॅक्स फ्री आहे. यामुळे तुम्हाला कर सवलतीचा मोठा फायदा मिळतो.
- खाते सुरू झाल्यानंतर पंधरा वर्षाचा लॉकिंग कालावधी असतो.
- सर्वात खास म्हणजे यात EEE लाभ मिळतो, म्हणजेच तुम्ही गुंतवलेली रक्कम त्यावरील व्याज आणि एकत्रित मिळणारी सर्व रक्कम टॅक्स फ्री असते.
हे पण वाचा| तब्बल 30 वर्षांनंतर कर्मदाता शनिदेव ‘या’ 3 राशींना बनवणार प्रचंड श्रीमंत! आयुष्यात येणार भरभरुन सुख-समृद्धी
गुंतवणूक कशी करावी?
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही अगदी पाचशे रुपयांपासून सुरुवात करू शकता. पण जर तुम्ही वर्षभरात जास्तीत जास्त 1.5 लाख पेक्षा जास्त रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीच्या वेळी हातात मोठा फंड मिळतो. या योजनेचे सोपगणित खालील प्रमाणे समजून घेऊया. Post Office Scheme
40 लाख रुपये कसे मिळवाल?
जर समजा तुम्ही दरमहा 12500 रुपये बचत करून PPF योजनेमध्ये पंधरा वर्षासाठी गुंतवणूक केले. तर एकूण मूळ गुंतवणूक 22.50 लाख होईल. यावर PPF योजनेअंतर्गत मिळणारे व्याज साधारणपणे 18.18 लाख रुपये असेल. म्हणजेच मॅच्युरिटीच्या वेळी गुंतवणूकदाराला तब्बल 40.68 लाख मिळतील. अशाप्रकारे या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही एक मोठे भांडवल तयार करू शकता.
या योजनेतील आणखीन फायदे
फक्त गुंतवणूक पुरतीच मर्यादित नसून या योजनेत तुम्हाला आणखीन सुविधा मिळतात. या योजनेत खाते उघडल्यास दुसऱ्या वर्षापासून लोन घेण्याची सुविधा मिळते. खते सुरू होऊन पाच वर्षानंतर अर्जंट गरज असल्यास तुम्ही पैसे काढू शकता. उदाहरणार्थ जर तुम्ही 2020-21 मध्ये खाते तयार केले आणि 2026-27 पर्यंत तुम्ही तुमची रक्कम काढू शकता. त्यावेळेस तितक्या कालावधीनुसार तुम्हाला व्याजदर लागू होईल आणि रक्कम मिळेल.
सुरक्षेतेत सर्वात उत्कृष्ट योजना
जर तुम्हाला शेअर मार्केट सारख्या रिस्की गुंतवणूक नको असेल तर PPF योजना ही भारत सरकारच्या हमीने चालवली जाणारी योजना असल्यामुळे यात पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. त्यामुळे ही योजना केवळ बचतीसाठीच नाही तर तुमच्या भविष्यातील मुलांचे शिक्षण, लग्न, निवृत्तीनंतरचा खर्च भागवण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. तुम्ही दररोजच्या खर्चातून थोडी रक्कम बाजूला काढून दर महिन्याला या योजनेत थोडीशी गुंतवणूक करून करोडपती होऊ शकतात. पोस्ट ऑफिस ची ही योजना म्हणजे सध्या लोकांसाठी भविष्यातील एक मजबूत आधार बनत आहे.
1 thought on “Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची कमाल स्कीम..! दरमहा थोडी बचत करा आणि मिळवा तब्बल 40 लाख रुपये”