महिलांसाठी पोस्ट ऑफिसच्या या 4 भन्नाट योजना देत आहेत जबरदस्त परतावा! जाणून घ्या सविस्तर

Post Office Schemes: आज-काल महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावं, महिलांचे आर्थिक स्थिती मजबूत बनावी त्यांच्या भविष्यासाठी थोडेफार पैसे राखून ठेवणे हे खूप महत्त्वाचे झाले आहे. महागाईच्या या काळात रोजच्या खर्चावर नियंत्रण ठेवून थोडेफार बचत करून कुठेतरी गुंतवणूक केल्यास उद्या मोठ्या अडचणीच्या वेळी हा पैसा नक्कीच उपयोगी ठरू शकतो. घर खर्च संभाळणाऱ्या महिला आई-बहीण ग्रहणे किंवा नोकरी करणारी एखादी महिला पोस्ट ऑफिसच्या या बचत योजनेत गुंतवणूक करून सुरक्षितपणे चांगला परतावा मिळवू शकतात.

आज या लेखात आपण महिलांसाठी चांगला नफा मिळवून देणाऱ्या पोस्ट ऑफिसच्या चार भन्नाट योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या योजना सरकारी आहेत. त्यामुळे यात फसवणुकीचा प्रश्न निर्माण होत नाही. तुम्ही केलेली प्रत्येक गुंतवणूक 100% सुरक्षित राहू शकते. या योजनेमध्ये तुम्ही छोट्या छोट्या रकमेपासून गुंतवणूक सुरू करून मोठा नफा मिळू शकतात. चला तर मग जाणून घेऊया महिलासाठी फायदेशीर ठरणाऱ्या 4 योजना.

1) सुकन्या समृद्धी योजना—

सुकन्या समृद्धी योजना मुलींच्या भविष्यासाठी राबवली जाते. एखादी मुलगी जन्माला येते तेव्हा आई-वडिलांच्या मनात पहिला प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे तिच्या शिक्षण कसे करावे?, तिचं लग्न कसं करावं? अशावेळी सुकन्या समृद्धी योजना पालकांसाठी दिलासा देणारे ठरते. या योजनेमध्ये मुलगी दहा वर्षाची होईपर्यंत गुंतवणूक सुरू करता येते. या योजनेअंतर्गत वार्षिक तब्बल 8.2% व्याजदर सरकारकडून दिला जातो. मुलीच्या शिक्षणासाठी किंवा अठरा वर्षानंतर तिच्या लग्नासाठी या रकमेचा उपयोग करता येतो. गावात शेती करणारा गरीब शेतकरी असो किंवा शहरात एखादी नोकरी करणारा पालक असो सर्वांना त्यांच्या मुलीसाठी या योजनेत गुंतवणूक करता येते.

हे पण वाचा| खुशखबर! घटस्थापनापूर्वी सोन्याच्या दरात घसरण, चांदीही स्वस्त; पाहा 10 ग्रॅम सोन्याचा नवीन दर

2) सार्वजनिक भविष्य निर्वाह योजना (PPF) —

एखादी गृहणी असो किंवा नोकरी करणारे स्त्री असो भविष्यासाठी हातात पैसा हवा असतो. अशा महिलांसाठी पोस्ट ऑफिस ची PPF योजना अत्यंत उत्तम ठरत आहे. या योजनेमध्ये फक्त पाचशे रुपयांपासून गुंतवणूक करता येते. या योजनेअंतर्गत 7.1% निश्चित व्याजदर दिला जातो. पंधरा वर्षाचा कालावधी असल्यामुळे दीर्घकाळासाठी ही बचत योजना चांगला परतावा मिळवून देते. तुम्ही देखील तुमच्या म्हातारपणासाठी एखाद्या योजनेत पैसे गुंतवून चांगला परतावा मिळू इच्छित असाल तर ही योजना तुमच्यासाठी योग्य ठरू शकते. Post Office Schemes

3) राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) —

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना हमखास नफा देणारी योजना म्हणून देखील ओळखली जाते. ही योजना खास अशा नागरिकांसाठी आहे ज्यांना सुरक्षित गुंतवणूक हवी आहे. या योजनेत कमीत कमी पाच वर्षासाठी रक्कम गुंतवावी लागते. या योजनेअंतर्गत 7.70% वार्षिक व्याजदर दिला जातो. या योजनेचा आणखीन एक फायदा म्हणजे उत्पन्न कर कायद्याखाली करबचत मिळते. घर सांभाळणाऱ्या महिलांसाठी ही योजना उत्तम आहे. कारण एकदा पैसे गुंतवले की काही करायची गरज नाही. पाच वर्षानंतर तुम्हाला आपोआप या योजनेअंतर्गत चांगला परतावा मिळेल.

4) पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS) —

या योजनेमध्ये नोकरी करणारी महिला असो किंवा घरकाम करणारी एखादी ग्रहणी असो एकदा गुंतवणूक केली की निश्चित रक्कम दिली जाते. या योजनेमध्ये दर महिन्याला तुम्ही मोठा परतावा मिळू शकतात. या योजनेत कमीत कमी 1000 रुपयापासून गुंतवणूक सुरू करता येते. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर दर महिन्याला तुमच्या खात्यात व्याज जमा केले जाते. या योजनेमुळे दर महिन्याचा घर खर्च मुलांचे शिक्षण वैद्यकीय खर्च यासारख्या खर्चासाठी ही योजना उपयोगी ठरू शकते. ग्रामीण भागातील महिलांनी थोडाफार सासून ठेवलेला पैसा या योजनेत गुंतवल्यास महिन्याला घर खर्च भागवण्यास मोठा हातभार लागू शकतो.

आजकालच्या धावपळीच्या जीवनात आणि वाढत्या महागाईला पाहता महिलांनी स्वतः आपल्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करणे आवश्यक आहे. पोस्ट ऑफिसच्या या वेगवेगळ्या जबरदस्त योजना सुरक्षितपणे चांगला व्याजदर देतात. या योजनेमध्ये केलेली गुंतवणूक भविष्यासाठी मोठा आधार बनू शकतात. बचत छोटे असले तरी पोस्ट ऑफिस अंतर्गत या योजनेतून चांगला नफा मिळवता येतो. घरातील स्त्रिया घराचे बचट आणखीन चांगल्या पद्धतीने हाताळू शकतात.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “महिलांसाठी पोस्ट ऑफिसच्या या 4 भन्नाट योजना देत आहेत जबरदस्त परतावा! जाणून घ्या सविस्तर”

Leave a Comment

error: Content is protected !!