POST OFFICE YOJANA: आजकाल प्रत्येक जण विचार करत असतो मेहनतीने कमावलेले पैसे नेमकं कुठे गुंतवायचे? बँक ठेवीवर मिळणारे व्याज खूप कमी असते, आणि शेअर बाजारात जोखीम खूप जास्त असते. अशावेळी सुरक्षित आणि हमीदार परतावा मिळणाऱ्या सरकारी योजनेकडे लोकांची ओढ वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर पोस्ट ऑफिस ने जबरदस्त योजना सुरू केली आहे. पोस्ट ऑफिस नॅशनल सेविंग सर्टिफिकेट योजनेअंतर्गत छोट्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळू शकतो. योजना केवळ सुरक्षितच नाही तर उत्तम परतावा देणारे आहे.
7.7% वार्षिक व्याजदर
NSC योजनेत सध्या 7.70% वार्षिक व्याजदर दिला जातो. पण या योजनेची खरी ताकद आहे चक्रवाढ व्याज म्हणजेच दरवर्षी व्याज मूळ रकमेत मिळून त्यावर पुढच्या वर्षी परत व्याज दिले जाते. अशाप्रकारे छोटा रकमेवरही मोठा फायदा मिळवता येतो. POST OFFICE YOJANA
5 वर्षात 5 लाख रुपये कसे मिळतील?
जर एखाद्या व्यक्तीने या योजनेमध्ये एकदम अकरा लाख रुपयाची गुंतवणूक केली तर पाच वर्षानंतर त्याला 15 लाख 93 हजार 937 रुपये एकूण रक्कम मिळेल. यामध्ये जवळपास 4 लाख 93 हजार 937 रुपये केवळ व्याजातून मिळतात. म्हणजेच काहीही जोखीम न घेता पाच वर्षात जवळपास पाच लाख रुपयाचा फायदा तुमच्या खात्यात जमा होऊ शकतो.
हे पण वाचा| सर्वसामान्यांच्या खिशाला फटका! 10 तोळा सोन्याच्या दरात 16400 रुपयांची वाढ; जाणून घ्या आजचे दर
कमी गुंतवणुकीत जास्त फायदा
- जर तुमच्याकडे एकंदरीत मोठी रक्कम नाही? तरी काही हरकत नाही कारण या योजनेत फक्त एक हजार रुपयांपासून गुंतवणूक करून खाते उघडू शकता.
- गुंतवणुकीसाठी कोणतीही वरची मर्यादा नाही.
- मुलांच्या नावाने ही खाते उघडता येते अशावेळी पालक हे खाते ऑपरेटर बनवू शकतात.
- योजना पाच वर्षासाठी असते पैसे मध्येच काढता येत नाही त्यामुळे बचतीचा निश्चय पक्का होतो.
कर बचतीचा फायदा
NSC योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला आयकर कलमाच्या कलम 80 सी अंतर्गत कर बचतीचा फायदा मिळतो. म्हणजेच एका आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपये पर्यंत गुंतवणूक केली जाते. तर त्यावर कर द्यावा लागत नाही. त्यामुळे ही योजना फायद्याची तर आहेच त्यासोबत टॅक्स बचत देखील होते. आजच्या अनिश्चित काळात जोखीम टाळून चांगला परतावा देणारी पोस्ट ऑफिस ची अशी योजना मिळणे अवघड आहे. छोट्या रकमेपासून सुरुवात करून मोठ्या रकमेपर्यंत गुंतवणूक करता येते. तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी किंवा सुरक्षितेसाठी ही योजना महत्त्वाची भूमिका बजावू शकते.