पोस्ट ऑफिस घेऊन येत आहे भन्नाट योजना, मिळणार दोन लाख रुपये व्याज, इतक्या वर्षात होणार मालामाल

Post office Yojana : अलीकडच्या काही महिन्यांत बँकांचे एफडी व्याजदर प्रचंड घसरत चाललेत. रेपो रेट कमी झाल्यानं अनेकांना वाटत होतं की आपण पैसे कुठे गुंतवायचे, कारण बँकेत ठेवला तर व्याज थेट कमी दिसतंय आणि शेअर मार्केटमध्ये टाकायचा तर रोज काहीतरी नवीन गोंधळ. या सगळ्यात एक जागा मात्र आजही तितकीच भक्कम उभी आहे पोस्ट ऑफिस. कारण पोस्ट ऑफिसच्या योजनांचे व्याजदर अजूनही जैसे थे चालू आहेत आणि सुरक्षिततेबाबत तर लोकांचा विश्वास इथे सर्वाधिक. Post office Yojana

पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट योजना म्हणजे साध्या भाषेत पोस्टाची एफडी. पण इथे मोठं असं की पैशांवर संपूर्ण सरकारी हमी असते. कुठलाही धोका नाही, मूळ रक्कम सुरक्षितच आणि दशकालाही मार्केट खाली वर झालं तरी पोस्ट ऑफिसचा परतावा तसाच मिळतो. म्हणूनच अनेक गुंतवणूकदार पुन्हा एकदा या योजनेकडे वळताना दिसतायत. कारण एका वर्षापासून थेट पाच वर्षांपर्यंत गुंतवणुकीचा पर्याय आहे आणि व्याजदरही स्थिर दिले जातात.

लोक या योजनेला इतकं प्राधान्य देतायत त्याचं खरं कारण म्हणजे पाच वर्षांच्या पर्यायात मिळणारा 7.5 टक्के व्याजदर. बँका 5.5–6 टक्क्यांवर आल्या असताना पोस्ट ऑफिस अजूनही सात-साडेसात टक्के देतंय म्हणजे सर्वसामान्य माणसासाठी ही योजना सोनेरी संधीच ठरते. गुंतवणूक करता येते फक्त हजार रुपयापासून आणि वर मर्यादाच नाही. ज्याला जेवढं जमेल तेवढं.

यातील सर्वात चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे पाच वर्षांसाठी केलेल्या गुंतवणुकीतून फक्त व्याजाच्या स्वरूपात दोन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळतं. एखाद्याने पाच लाखांची रक्कम टाकली तर पाच वर्षानंतर मूळ रक्कम तशीच आणि त्यावरून जमा झालेलं व्याज वेगळं. म्हणून अनेक निवृत्त, गृहिणी, छोटे व्यावसायिक ज्यांना सुरक्षितता आणि स्थिर परतावा हवाय ते थेट पोस्ट ऑफिसच्या या टाईम डिपॉझिट योजनेकडे धाव घेतायत.

करसवलतीचाही फायदा मिळतोय, कारण पाच वर्षांच्या डिपॉझिटवर कलम 80C लागू होतं. म्हणजे सुरक्षितता आणि टॅक्स बचत ही दोन्ही गोष्टी एकाच योजनेत मिळत असल्याने ही योजना इतर सगळ्यांपेक्षा थोडी पुढे ठरते. आणि महत्त्वाचं म्हणजे मार्केटमध्ये कितीही उतार-चढाव झाले तरी परतावा ठरलेला मिळणार, हे लोकांसाठी मोठं समाधान आहे.

थोडक्यात सांगायचं झालं तर 2025 मध्ये सुरक्षित बचत, टॅक्स बचत आणि स्थिर व्याजदर हवे असतील तर पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट हीच योजना अनेकांना सर्वात जास्त फायदा देणारी ठरत आहे. मूळ रक्कम हातात तशीच आणि फक्त व्याजातून मिळणारं दोन लाखांचं उत्पन्न या एकाच कारणानं हजारो गुंतवणूकदार पोस्ट ऑफिसकडे परत वळताना दिसत आहेत.

(Disclaimer : वरील दिलेली माहिती ही केवळ माहिती करीत आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही. आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या.)

हे पण वाचा | पैसे दुप्पट करणारी पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! जाणून घ्या योजनेबद्दल सविस्तर माहिती

Leave a Comment

error: Content is protected !!