Railway viral video | रेल्वे प्रवास म्हटलं की अनेक आठवणी डोळ्यापुढे उभ्या राहतात. कोणाला खिडकीत बसून दृश्ये पाहायची आवड असते, तर कोणाला लोअर बर्थ मिळावा म्हणून धडपड चाललेली असते. मात्र एक मोठा प्रश्न कायम प्रवाशांना भेडसावतो ट्रेनमधल्या पंख्याची हवा पोहोचत नाही, विशेषतः अपर बर्थवर. अशा वेळी लोक घामाघूम होऊन प्रवास करतात, पण आता एका पठ्ठ्याने असा भन्नाट जुगाड करून दाखवला की, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहून लोक पोट धरून हसतायत. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतो आहे.Railway viral video
घटना अशी की, रेल्वेच्या प्रवासादरम्यान एक प्रवासी स्वतःचा छोटासा कूलर बरोबर घेऊन आला. जिथे लोक फक्त मोबाईल किंवा लॅपटॉप चार्ज करण्यासाठी स्विच पॅनल वापरतात, तिथे या प्रवाशाने थेट आपला वैयक्तिक कूलर लावला. वरच्या बर्थवर झोपलेला तो बिनधास्त कूलरची हवा खात बसला होता. तीन पंखे आधीच चालू असतानाही त्याच्या डोक्याच्या अगदी जवळ कूलर चालू होता. हे पाहून शेजारी बसलेल्या प्रवाशाने लगेच हा क्षण मोबाईलमध्ये टिपला आणि आता तो व्हिडिओ इंटरनेटवर गाजतोय.
ट्रेनमधल्या सॉकेटमध्ये सहसा मोबाईल, पॉवर बँक, लॅपटॉपसारखी कमी पॉवर लागणारी उपकरणं वापरता येतात. पण जास्त पॉवर घेणारी साधनं जोडणं हा नियमभंग मानला जातो. कूलरला मोठी वीज लागते आणि त्यामुळे रेल्वेत कूलर वापरणं धोकादायक मानलं जातं. नियमाप्रमाणे असं केल्यास दंड किंवा तुरुंगवासही होऊ शकतो. पण या प्रवाशाने मात्र नियमांचा विचार न करता, आपली सोय करून घेतली.
सोशल मीडियावर या व्हिडिओवर भन्नाट कमेंट्स येत आहेत. कुणी म्हणतंय, “भाऊने तर एसीपेक्षा भारी व्यवस्था करून घेतली”, तर कुणी लिहितंय, “भारतीय जुगाडाला तोड नाही.” खरंच, भारतीय प्रवासी कुठल्या परिस्थितीत स्वतःची सोय कशी करून घेतो याचं उत्तम उदाहरण या घटनेतून दिसतं.
