Rain Alert | शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे. राज्यातील हवामान मध्ये पुन्हा एकदा बदल झालेला आहे. भारतीय हवामान खातेने राज्यातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज लक्षात घ्यायचा आहे. तसेच राज्यांमध्ये आता आपल्या लाडक्या बाप्पाचा आगमन झालेला आहे आणि त्याच बाप्पाच्या आगमना दिवशी काही ठिकाणी पावसाने हजेरी देखील लावलेली आहे. तर काही ठिकाणी हवामान खात्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. नवीन अंदाज जाणून घ्या. Rain Alert
गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये पावसाची चाहूल कमी वाटली होती आणि पावसाने विश्रांती देखील घेतलेली होती. परंतु आता आभाळ मध्ये ढग जमायला तयार झाले आहेत आणि अशाच पुन्हा एकदा हवामान विभागाने पुन्हा एकदा इशारा दिलेला आहे. पुढील दोन दिवस मराठवाडा आणि घाटमाथ्यावरती जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा शेत्र निर्माण झाले, तर उत्तर मध्ये प्रदेशच्या दिशेने चक्रकार वारे फिरताय, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवरती रायगड पुण्याचे घाटमाथा भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. शिवाय सातारा, कोल्हापूर, हिंगोली, परभणी, नांदेड या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार असं सांगितलं जातंय.
राज्यातल्या इतर भागात पावसाचा जोर थोडा ओसरला, त्यामुळे तिथे उकडा जाणवतोय तापमान ही थोडं वाढले. शेतकरी म्हणतात की जरा अजून पाऊस यायला हवा, पिक उभा आहेत, पाण्याची गरज आहे. त्यामुळे हा नवा अंदाज शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.
मुंबई आणि आसपास वातावरण ढगाळ झाले, अधून मधून पावसाच्या सरी पडताना पाहायला मिळतात. आता राज्यात गणपतीचा आगमन झाला आहे आणि पावसाच्या या हालचालीमुळे थोड तयारी करताना आवाहन वाढली आहेत तसेच शेती पिकांसाठी आणि पाणीटंचाईशी झुंजणाऱ्या भागांसाठी हा पाऊस उपयुक्त ठरू शकतो.
हे पण वाचा | महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होणार! मात्र या तारखेपासून पुन्हा मुसळधार पाऊस होणार..